पैठण : नागरिकत्वाच्या मुद्यावरून आज मुस्लिमाकडे संशयाने बघण्याची गरज नाही. कितीतरी हिंदूकडेही पुरावे मिळणार नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा कायदा जाणिवपूर्वक लागू केला असून सामाजिक दुरावा निर्माण करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. मोदी यांना दुसऱ्यांच्या घरात डोकावून पाहायला खूप आवडते; मात्र त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी जनता पेटून उठल्यानंतर इंग्रजांना जसे पळून जावे लागले तसेच मोदींनाही पळून जावे लागणार आहे असे प्रतिपादन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पैठण येथे बोलताना केले.
सुधारित नागरिकत्व कायदा, एनआरसीच्या विरोधात एनआरसी व सीएए विरोधी कृती समिती पैठण च्या वतीने आज पैठण शहरातून रँली काढण्यात आली. रँलीचा समोराप गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी खंडोबा चौकातील जाहिर सभेत मार्गदर्शन करून केला या प्रसंगी त्यांनी मोदी शहा यांच्यासह केंद्रसरकारच्या विविध धोरणावर कडक टिका केली. सकाळी ११ वाजेच्या दरम्यान पैठण शहरातील नेहरू चौकातून रँलीस प्रारंभ करण्यात आला. रँलीत पैठण तालुक्यातील मुस्लिम बांधवांसह सर्वधर्मीय नागरिक सहभागी झाले होते. सर्वधर्मीय सर्वपक्षीय पाठिंबा मिळाल्याने शहरातील व्यापाऱ्यांनीही आपली दुकाने बंद ठेवली होती. आंदोलक विविध घोषवाक्य असलेले फलक हातात घेउन रँलीत सहभागी झाले होते, रँली नेहरू चौक, भाजीमार्केट, छत्रपती शिवाजी महाराज चौक, संभाजी चौक बसस्थानक मार्गे खंडोबा चौकात येताच विसर्जित करून तेथे गृहमंत्री जितेंद्र आव्हाड यांची जाहिर सभा घेण्यात आली.
व्यासपीठावर जमाते उलमाचे राज्य अध्यक्ष हाफेज नदीम सिद्दीकी, डॉ राम बाहेती, किसन चव्हाण, विलास खरात, जमाते ईस्लामी चे प्रवक्ते नौशाद उस्मान, माजी मंत्री अनिल पटेल, दत्ता गोर्डे, रवींद्र काळे, विनोद तांबे, रविंद्र शिसोदे, संजय वाघचौरे, आप्पासाहेब निर्मळ, रविंद्र शिसोदे, मुफीद पठाण, अशोक बर्डे, शहर ए काझी, हसनोद्दीन कटयारे, राजू विटभट्टीवाले, मुन्ना आंबेकर, पाशा धांडे, पंडित किल्लारीकर, राजू गायकवाड, स्वप्नील साळवे, अनिल घोडके, आप्पासाहेब गायकवाड, भाऊसाहेब पिसे आदी मान्यवर उपस्थित होते.