शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
5
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
6
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
7
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
8
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
9
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
10
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
11
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
12
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
13
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
15
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
16
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
17
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
18
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

मोदी फॅक्टरच ठरतोय अडचणीचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 12:56 AM

मागील विधानसभा आणि लोकसभा निवडणुका भाजपाने केवळ नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्यावर जिंकल्या होत्या़ मात्र हाच मोदी फॅक्टर नांदेडच्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये खुद्द भाजपा उमेदवारांसाठी अडचणीचा ठरत आहे. स्थानिक नेतृत्वाविना लढत असलेल्या भाजपाला नेटीझन्सच्या टीकेचा सामना करावा लागत असून प्रचारावेळीही नोटबंदी, जीएसटी आणि इंधन दरवाढीसारख्या मुद्दयांवर मतदारांकडून भाजपा उमेदवारांना जाब विचारला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: मागील विधानसभा आणि लोकसभा निवडणुका भाजपाने केवळ नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्यावर जिंकल्या होत्या़ मात्र हाच मोदी फॅक्टर नांदेडच्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये खुद्द भाजपा उमेदवारांसाठी अडचणीचा ठरत आहे. स्थानिक नेतृत्वाविना लढत असलेल्या भाजपाला नेटीझन्सच्या टीकेचा सामना करावा लागत असून प्रचारावेळीही नोटबंदी, जीएसटी आणि इंधन दरवाढीसारख्या मुद्दयांवर मतदारांकडून भाजपा उमेदवारांना जाब विचारला जात आहे.तीन वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी यांचा सर्वव्यापी करिष्मा होता. त्यामुळेच स्थानिक उमेदवार कमकुवत असतानाही मूळ विषयापासून मतदारांचे लक्ष दुसरीकडे वळविण्यात भाजपाला यश आले होते. मोदी फॅक्टर ही या पक्षासाठी मोठी ताकद होती. त्याचवेळी भाजपा नेत्यांकडूनही घोषणा आणि कार्यक्रमांचा भडीमार केला जात होता. त्यामुळे सोशल मीडियावरही ‘सब कुछ नरेंद्र मोदी’ असे चित्र होते. मागील तीन वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. ज्या अपेक्षेने मतदार भाजपाच्या पाठीशी राहिला होता तो आता अस्वस्थ असल्याचे दिसत असून त्याचे प्रतिबिंब सध्या सोशल मीडियामध्ये उमटत आहे़ ज्या सोशल मीडियाने नरेंद्र मोदींना खांद्यावर घेतले होते़ तेथेच आता टीकेचा भडीमार सुरु आहे़ कालपर्यंत काँग्रेसने एवढ्या वर्षांत काय केले ? असा प्रश्न मतदार उपस्थित करायचे़ मात्र आता सोशल मीडियासह सर्वसामान्यांच्याही तोंडी नोटबंदी, जीएसटी आणि इंधन दरवाढ आदीसारखे मुद्दे आहेत़ त्यातच कर्जमाफीचा मुद्दाही कळीचा ठरतो आहे. केंद्र व राज्य शासनाच्या कारभारामुळे होणाºया टीकेमुळे प्रचाराचे लक्ष स्थानिक विषयांकडे वळवावे म्हटले तरीही भाजपाची अडचण होत आहे. नांदेड महानगरपालिकची निवडणूक भाजपा सेना आमदारांच्या नेतृत्वाखाली लढत आहे.दुसरीकडे एकेकाळी मित्रपक्ष असलेली शिवसेनाही ६७ उमेदवारांसह रिंगणात उतरल्याने भाजपाची चौफेर कोंडी झाल्याचे चित्र आहे. त्यामुळेच प्रचाराची नेमकी दिशा काय ठरवावी यावरुन पदाधिकारीही गोंधळात असल्याचे चित्र आहे़ यामुळेच की काय नांदेड मनपा निवडणुकीत याचा नेमका फायदा काँग्रेस उचलत असून केंद्र व राज्य सरकारने नांदेडवर कसा अन्याय केला हे मतदारांना प्रचारसभांच्या माध्यमातून सांगितले जात आहे.स्मार्ट सिटी योजनेत नांदेड मनपाला चांगले गुण मिळूनही केवळ पक्षीय आकसापोटी या योजनेतून नांदेडला वगळल्याचे काँग्रेस पदाधिकारी जाहीर आरोप करीत आहेत.याबरोबरच स्वतंत्र विभागीय आयुक्तालयाचा मुद्दाही प्रचारादरम्यान काँग्रेसकडून उपस्थित केला जात आहे. भाजपाचे निवडणूक प्रभारी लातूर जिल्ह्यातील संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्यामुळेच नांदेडला स्वतंत्र आयुक्तालय होत नसल्याचाही काँग्रेसचा आरोप असून या आरोपाला उत्तर देतानाही भाजपाची अडचण होत आहे.