लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : महाविद्यालयीन युवतीची आक्षेपार्ह चित्रफीत काढून ती सोशल मीडियावर पसरवून तिची समाजात बदनामी केल्याबद्दल आणि तिचे जमलेले लग्न मोडून त्रास देत असल्याच्या आरोपावरून विश्वंभर शेषेराव तिडके याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.२०१४ साली पीडित युवती आणि विश्वंभर तिडके याची मैत्री झाली. मैत्रीचा गैरफायदा घेत विश्वंभरने पीडितेचा फोटो प्राप्त केला आणि संगणकावर छेडछाड करून त्यासोबत स्वत:चा फोटो जोडला. हा फोटो आता माझ्या मित्रांना दाखवतो, अशी धमकी देऊन त्याने ब्लॅकमेल करून तिचा विनयभंग केला आणि त्याची चित्रफीत तयार केली. हा प्रकार कोणाला सांगितला तर माझ्याजवळील बंदुकीने तुझ्या भावाचा खून करीन, अशी धमकीही त्याने दिल्याचे पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे. यामुळे घाबरलेल्या मुलीेने या घटनेची वाच्यता कुठेही केली नाही. परंतु, आरोपी विश्वंभर तिडके याने आक्षेपार्ह चित्रफीत व्हॉट्सअपवरून मित्रांना पाठवून व्हायरल केल्याचे १४ आॅगस्ट रोजी पीडितेला तिच्या भावाकडून समजले. तसेच तिच्या नावे बनावट फेसबुक खाते उघडून विश्वंभर त्यावरून इतरांशी बोलत असून त्यावर तिचे फोटो टाकल्याचेही भावाने सांगितले. यानंतर सदर पीडित युवतीने थेट अंबाजोगाई शहर पोलीस ठाणे गाठत तक्रार नोंदविली.
ब्लॅकमेल करून युवतीचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 12:45 AM