सभापती पडुळे यांनी शुक्रवारी सकाळी पाचोडला तुरीसंदर्भात बैठक घेतली. शासकीय हमीभावात तूर खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी शासनदरबारी प्रयत्न केले असून, त्याला यश आले आहे. त्यामुळे पाचोडसह परिसरातील शेतकऱ्यांची तूर हमीभावात सहा हजार प्रतिक्विंटलप्रमाणे खरेदी करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याची सुरुवात २८ डिसेंबरपासून होणार आहे. नोंदणी करताना शेतकऱ्यांनी आपली माहिती भरणे अनिवार्य असून, संदेश प्राप्त झाल्यानंतर शेतकऱ्यांनी आपली तूर विक्रीसाठी केंद्रावर आणायची असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यावेळी तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजू भुमरे, पंचायत समितीचे उपसभापती कृष्णा भुमरे, पाचोड सोसायटीचे अध्यक्ष जिजा भुमरे, गोरख हिंगले, माजी सरपंच अंबादास नरवडे, अप्पासाहेब शेळके आदी उपस्थित होते.
तूर खरेदीचा सोमवारपासून मुहूर्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 4:04 AM