शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
2
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
3
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
4
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
5
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
6
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान
7
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
8
Pahalgam Attack Update : "भाऊ, वहिनी मॅगी खात होते, गोळी लागताच रक्ताच्या थारोळ्यात..."; काळजात चर्र करणारी घटना
9
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
10
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी स्तब्ध पडून राहिली नवी नवरी
11
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
12
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
13
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
14
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
15
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
16
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
17
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
18
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
19
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
20
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर

किडनीसाठी पैशांचा व्यवहार? रक्ताचे नाते नसलेल्यांकडून किडनी दान, समिती करते पडताळणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 12:48 IST

जागतिक किडनी दिन विशेष: रक्ताचे नाते नसेल आणि किडनी द्यायची असेल तर किडनीदाता आणि किडनी प्राप्तकर्ता यांना या समितीसमोर उपस्थित राहून परवानगी घ्यावी लागते.

छत्रपती संभाजीनगर : रक्ताच्या नात्यातील व्यक्तीला किडनी देण्यासाठी रुग्णालयांस्तरावरच प्रक्रिया होते. मात्र, रक्ताचे नाते नसलेला व्यक्ती किडनी देणार असेल तर मानवी अवयव प्रत्यारोपण प्राधिकार समितीकडून परवानगी घ्यावी लागते. ही समिती किडनीदानात पैशांचा व्यवहार, दात्यावर कोणताही दबाव नसल्याची पडताळणी करते आणि त्यानंतरच परवानगी देते. समितीने गेल्या वर्षभरात ३२ जणांना किडनीदानाची परवानगी दिली. विशेष म्हणजे एकाचीही परवानगी नाकारली नाही.

दरवर्षी मार्च महिन्यात दुसऱ्या गुरुवारी जागतिक किडनी दिन साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश किडनीच्या आजाराबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि किडनीचे आरोग्य राखण्याचे महत्त्व पटवून देणे हा आहे. रक्ताच्या नाते नसलेल्या व्यक्तीला किडनी देण्यासाठी मानवी अवयव प्रत्यारोपण प्राधिकार समितीची परवानगी घ्यावी लागते. घाटी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक या समितीचे अध्यक्ष आहेत. या समितीत इतर ११ जणांचा समावेश आहे. आई, वडील, मुलगा, मुलगी, बहीण, भाऊ, पती, पत्नी, आजोबा, आजी यासह रक्ताच्या नात्यातील व्यक्तीला किडनी देताना रुग्णालयस्तरावर प्रक्रिया होते. मात्र, रक्ताचे नाते नसेल आणि किडनी द्यायची असेल तर किडनीदाता आणि किडनी प्राप्तकर्ता यांना या समितीसमोर उपस्थित राहून परवानगी घ्यावी लागते. रुग्णांप्रति सहानुभूतीतून पुढाकार घेऊन किडनीदान होत असल्याची खात्री केली जाते.

ऑन पेपर अन् इन कॅमेरा चौकशीपरवानगी घेण्यासाठी ऑन पेपर आणि इन कॅमेरा चौकशी केली जाते. पोलिसांकडूनही पडताळणी केली जाते. बँक स्टेटमेंटची पडताळणी केली जाते. यातून काही आर्थिक देवान-घेवाण झाले आहे का, याची खातरजमा केली जाते.

रक्ताचे नाते नसलेल्या किती जणांना परवानगी?तारीख- किती जणांना परवानगी?२१ फेब्रुवारी २०२४- ६८ मे २०२४ -२१२ जून २०२४-९२ ऑगस्ट २०२४-२४ ऑक्टोबर २०२४- ८८ जानेवारी २०२५- ३२७ फेब्रुवारी २०२५-२

सर्व पडताळणीअंतीच परवानगीसर्व पडताळणी केल्यानंतरच रक्ताचे नाते नसलेल्या व्यक्तीला किडनीदानासाठी परवानगी दिली जाते. किडनी दात्यावर काही दबाव आहे का, पैशांचा व्यवहार झाला आहे का, याची खातरजमा केली जाते. यासंदर्भात पोलिसांकडूनही पडताळणी केली जाते. गेल्या वर्षभरात कुणालाही परवानगी नाकारण्यात आलेली नाही.- डाॅ. सुरेश हरबडे, अध्यक्ष, मानवी अवयव प्रत्यारोपण प्राधिकार समिती

टॅग्स :Organ donationअवयव दानchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरHealthआरोग्य