शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
7
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
8
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
9
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
10
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
11
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
12
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
13
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
14
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
15
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
16
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
17
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
18
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
19
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
20
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई

पैशाचे पाणी ! मराठवाड्यात लागतात विहीर अधिग्रहणासाठी रोज २२ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 2:38 PM

बीडमध्ये सर्वाधिक विहिरी प्रशासनाच्या ताब्यात

ठळक मुद्दे ५ हजार ३२१ विहिरी विभागात अधिग्रहित ४०० रुपये रोज एका विहिरीसाठी अधिग्रहणासाठी

- विकास राऊत 

औरंगाबाद : मराठवाड्यात दिवसाकाठी सुमारे २२ लाख रुपये रोज विहीर अधिग्रहणासाठी मोजावे लागत आहेत. पाण्यासाठी पैसा मोजून दुष्काळावर मात केली जात आहे. गेल्या आठवड्याच्या अखेरीस ५ हजार ३२१ विहिरी विभागात अधिग्रहित करण्याचा आकडा होता. वेळेत मान्सूनचे आगमन झाले नाही, तर विहिरी अधिग्रहणाचा आकडा वाढण्याची शक्यता प्रशासकीय सूत्रांनी वर्तविली आहे. ४०० रुपये रोज एका विहिरीसाठी अधिग्रहणासाठी प्रशासकीय मान्यतेने देण्यात येतो. विहिरींचे अधिग्रहण कमी-अधिक प्रमाणात होते. 

मे महिन्याच्या सुरुवातीपासून आजवर साधारणत: ३ कोटींच्या आसपास रक्कम विहिरींच्या अधिग्रहणासाठी लागली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मे महिन्याच्या सुरुवातीस झालेल्या आॅडिओ ब्रीज (संवाद सेतू)मध्ये बहुतांश सरपंचांकडून विहीर अधिग्रहणाची रक्कम वाढवून देण्याची मागणी आली आहे. शासनाने या मागणीचा विचार केला, तर अधिग्रहणाचे दिवसाकाठी ४०० रुपयांचे दर वाढण्याची शक्यता आहे. ३ हजारांच्या पुढे टँकरचा आकडा गेला असून, विभागातील २५ टक्के लोकसंख्या टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहे. यावरून यंदाचा दुष्काळ किती भीषण आहे, याचा अंदाज येतो आहे. विभागातील २,३०० गावे आणि ८०० वाड्यांवर पाणीटंचाई आहे. ८ हजार ५५० पैकी २,३०० गावे म्हणजे २५ ते २७ टक्के ग्रामीण भाग दुष्काळाने होरपळल्याचे स्पष्ट आहे. 

बीडमध्ये सर्वाधिक विहिरी ताब्यात औरंगाबाद जिल्ह्यात ५३२ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. जालना ६६२, परभणी ३६०, हिंगोली ४४९, नांदेड ६७५, बीड ९५३, लातूर ८१८, उस्मानाबाद ८७२ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. बीड जिल्ह्यात सर्वाधिक ९५३ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. 

जिल्हा    विहिरींची संख्या    अधिग्रहण रोजचा खर्चऔरंगाबाद    ५३२    २ लाख १२ हजार ८००जालना    ६६२    २ लाख ६४ हजार ८००परभणी    ३६०    १ लाख ४४ हजार हिंगोली    ४४९    १ लाख ७९ हजार ६००नांदेड    ६७५    २ लाख ७० हजारबीड    ९५३    ३ लाख ८१ हजार २००लातूर    ८१८    ३ लाख २७ हजार २००उस्मानाबाद    ८७२    ३ लाख ४८ हजार ८००एकूण    ५३२१    २१ लाख २८ हजार ४०० 

टॅग्स :droughtदुष्काळfundsनिधीMarathwadaमराठवाडा