शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्टिकल 370 वरून जम्मू-काश्मीर विधानसभेत गदारोळ, हाणामारी अन् पोस्टरही फाडलं; बघा VIDEO
2
“महाराष्ट्राच्या परिवर्तन हवे, जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे काम करावे लागेल”: शरद पवार
3
"मित्रपक्षाने अशी दगाबाजी करणं..."; भास्कर जाधवांना संताप अनावर, काँग्रेसला सुनावलं
4
राज ठाकरेंच्या मनसेला आम्ही ऑफर दिली होती, पण...; CM एकनाथ शिंदेंचा दावा
5
ममता बॅनर्जींचा भाचा पश्चिम बंगालचा पुढील मुख्यमंत्री होणार? अचानक राजकीय चर्चांणा उधाण
6
"तुला जीवाची पर्वा आहे की नाही?”; लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने फॅशन डिझायनरला धमकी
7
शरद पवारांबाबत आक्षेपार्ह भाषा; टीकेची झोड उठल्यानंतर सदाभाऊंकडून दिलगिरी, म्हणाले...
8
Guruwar Astro Tips: कार्तिक महिन्यातला पहिला गुरुवार; झपाट्याने प्रगतीसाठी करा 'हे' चार उपाय!
9
भगीरथ भालकेंनी शरद पवारांशी गद्दारी केली; धैर्यशील मोहितेंची टीका; प्रणिती शिंदेंकडून पलटवार!
10
'फेक नॅरेटिव्ह'च्या फॅक्टरीचे शरद पवार मालक, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
11
आधी आरोप, मग अजित पवारांना पवित्र करून घेतले, जयंत पाटील यांचे टीकास्र
12
"मला धमक्या मिळत आहेत...", विक्रांत मेस्सीचा खुलासा; 'द साबरमती रिपोर्ट' ठरलं कारण?
13
अशोक सराफ यांच्या नवीन मालिकेत 'ही' अभिनेत्री साकारणार प्रमुख भूमिका, नव्या प्रोमोने उत्सुकता शिगेला
14
WI vs ENG: कार्टीच्या विक्रमी सेंच्युरीच्या जोरावर कॅरेबियन संघाची मालिका विजयाची 'पार्टी'
15
बाळासाहेब ठाकरेंच्या एका वाक्याने निवडला गेला होता शिवसेनेचा उमेदवार; निकाल काय लागला?, वाचा...
16
"राहुल गांधींनी नागपुरात कोरं संविधान दाखवलं तर मुंबईत..., बाबासाहेबांचा 'हा' अपमान..."; VIDEO शेअर करत भाजपचा हल्लाबोल
17
भाजपच्या ४० बंडखोरांची सहा वर्षांसाठी हकालपट्टी, काही बंडखोरांवर अद्याप पक्षाकडून कारवाई नाही
18
परप्रांतीयांच्या मतांसाठी भाजपचे ‘मायक्रो मॅनेजमेंट’, राज्य, भाषानिहाय डेटा बँक करून जबाबदारी
19
'डिमोशन' झालं तरी KL Rahul मध्ये सुधारणा नाहीच; कसं मिळेल रोहितच्या जागी 'प्रमोशन'?
20
BSNL चा शानदार प्लॅन मिळवण्याचा आजचा शेवटचा दिवस, 365 दिवसांसाठी मिळेल 600GB डेटा!

मंकीपॉक्सचे सध्या 'नो टेन्शन'; डॉ. रमण गंगाखेडकरांनी सांगितला कोरोना-मंकीपॉक्समधील फरक

By संतोष हिरेमठ | Published: July 26, 2022 3:06 PM

'कोरोना जसा पसरला त्या प्रमाणात मंकीपाॅक्स पसरण्याची सध्यातरी शक्यता नाही. त्यामुळे याला फार घाबरण्याची गरज नाही'

औरंगाबाद : देशात मंकीपाॅक्सचे आजपर्यंत केवळ चार रुग्ण आढळून आले आहे. जेव्हा एका व्यक्तीपासून अनेक व्यक्तीला लागण होण्याची शक्यता असते तेव्हा घाबरण्याची गरज असते. कोरोना जसा पसरला त्या प्रमाणात मंकीपाॅक्स पसरण्याची सध्यातरी शक्यता नाही. त्यामुळे याला फार घाबरण्याची गरज नाही, असे ‘आयसीएमआर’चे माजी साथरोग आणि संसर्गजन्यरोग विभागप्रमुख पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर म्हणाले. एमजीएम इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सच्या पदवीदान समारंभानिमित्त औरंगाबादेत आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

दिल्लीत मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर देशातील या आजाराच्या बाधितांची संख्या आता चारवर पोहोचली आहे. दिल्लीतील रुग्ण ३४ वर्षे वयाचा असून, त्याने कधीही विदेश प्रवास केलेला नाही. त्याने काही दिवसांपूर्वी हिमाचल प्रदेशमधील मनाली येथे एका लग्नाच्या आदल्या दिवशी झालेल्या बॅचलर पार्टीला हजेरी लावली होती. दिल्लीतील या बाधिताला लोकनायक जयप्रकाश रुग्णालयात विलगीकरणात ठेवले आहे. या रुग्णाची प्रकृती आता सुधारत आहे. देशातील मंकीपॉक्सचे पहिले तीन रुग्ण केरळमध्ये सापडले होते. 

दरम्यान, कोरोना नंतर मंकीपोक्समुळे नागरिक चिंतेत आहेत. मात्र, हा आजार आला तर रुग्णालयात भरती होऊन मोठे उपचार करावे लागतील, मृत्यू होतील, असे वाटते. परंतु यात केवळ ०.१ टक्के मृत्यूचा धोका आहे. रुग्णालयात येणारे रुग्ण केवळ आयसोलेट होण्यासाठी भरती होतील, असे मत डॉ. रमण गंगाखेडकर यांनी व्यक्त केले. तसेच कोरोना जसा पसरला त्या प्रमाणात मंकीपाॅक्स पसरण्याची सध्यातरी शक्यता नाही. त्यामुळे याला सध्यातरी फार घाबरण्याची गरज नाही, असा विश्वासही डॉ. गंगाखेडकर यांनी व्यक्त केला.

WHO ने बारकाईने लक्ष ठेवण्याचे केले आवाहनदरम्यान, डब्ल्यूएचओचे दक्षिण-पूर्व आशियाच्या प्रादेशिक संचालिक डॉ. पूनम खेत्रपाल सिंह म्हणाल्या की, मंकीपॉक्सची प्रकरणे पुरुषांशी संबंध ठेवणाऱ्यांमध्ये वाढत आहेत. ज्या देशांमध्ये यापूर्वी एकही रुग्ण आढळला नव्हता, त्या देशांमध्येही आता मंकीपॉक्सचा प्रसार वेगाने होत आहे. रोगाची बहुतेक प्रकरणे पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवणाऱ्यांमध्ये दिसत आहेत. WHO ने दक्षिण-पूर्व आशिया क्षेत्रातील देशांना मंकीपॉक्सवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे आणि योग्य उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादHealthआरोग्य