शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
2
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
3
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
4
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
5
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
6
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
7
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
8
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
9
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
10
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
11
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
12
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
13
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
14
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
15
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
16
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
17
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
18
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
19
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
20
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू

तुटलेल्या जाळीतून माकड बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2016 11:46 PM

औरंगाबाद : मनपाच्या प्राणिसंग्रहालयात रविवारी अचानक जुन्या पिंजऱ्याच्या तुटलेल्या जाळीतून एक माकड बाहेर पडले. बाहेर येताच त्याने पर्यटकांना जखमी करण्यास सुरुवात केली.

औरंगाबाद : मनपाच्या प्राणिसंग्रहालयात रविवारी अचानक जुन्या पिंजऱ्याच्या तुटलेल्या जाळीतून एक माकड बाहेर पडले. बाहेर येताच त्याने पर्यटकांना जखमी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. सर्व पर्यटकांना बाहेर काढून तातडीने प्राणिसंग्रहालय रिकामे करण्यात आले. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी तब्बल दोन तास प्रयत्न करून या माकडाला पुन्हा पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले. यावेळी माकडाच्या हल्ल्यात प्राणिसंग्रहालयातील दोन कर्मचारी किरकोळ जखमी झाले. रविवारच्या सुट्टीमुळे आज प्राणिसंग्रहालयात पर्यटकांची मोठी गर्दी होती. त्यातच सकाळी ११ वाजता एक माकड पिंजऱ्याच्या जाळीतून उडी मारून बाहेर आले. त्यावेळी पिंजऱ्याच्या जवळ अनेक लहान मुले, महिला होत्या. बाहेर पडताच उड्या मारत माकडाने पर्यटकांना ओरखडे मारण्यास सुरुवात केली. त्यामुळे प्रचंड गदारोळ माजला. प्राणिसंग्रहालय प्रशासनाने खबरदारी म्हणून लगेचच सर्व पर्यटकांना बाहेर काढून प्राणिसंग्रहालयाचे गेट बंद केले. लगेचच वन विभागाला याविषयी माहिती देण्यात आली. दुसरीकडे प्राणिसंग्रहालयातील कर्मचाऱ्यांन या माकडाला पकडण्याचे प्रयत्न सुरू केले; परंतु ते दूर दूर उड्या मारून पळत होते. एखादा कर्मचारी पकडण्यास गेला तर त्याला हाताच्या पंजाने मारत होते. दोन तासांच्या परिश्रमानंतर प्राणिसंग्रहालयाच्या कर्मचाऱ्यांनी माकडाला पकडून पुन्हा पिंजऱ्यात बंद करण्यात आले; मात्र तोपर्यंत प्रवीण बत्तीसे आणि दुसरा एक कर्मचारी किरकोळ जखमी झाला. माकडाला जेरबंद केल्यानंतर लगेचच पिंजऱ्याच्या जाळीची डागडुजी करण्यात आली. इतर पिंजऱ्यांचाही आढावा घेण्यात आला.