औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात गुरूवारी दिवसभरात १३७ नव्या कोरोना बाधित रूग्णांची भर पडली असून ३०१ रूग्ण उपचार घेऊन घरी परतले आहेत. इतर जिल्ह्यांतील २ आणि औरंगाबाद जिल्ह्यातील ६ रूग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. यासह आता जिल्ह्यातील एकूण कोरोनामुक्त रूग्णांची संख्या गुरूवारी ३० हजारांच्याही पुढे गेली आहे.
१३७ रूग्णांपैकी ५२ रूग्ण ग्रामीण भागातील असून २६ रूग्ण मनपा हद्दीतील व ५९ रूग्ण अन्य ठिकाणचे आहेत. यात ॲन्टीजन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास ५९ आणि ग्रामीण भागात २० रूग्ण आढळलेले आहेत. आजघडीला जिल्ह्यात ३,७३५ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
मराठवाड्याचा अहवाल
औरंगाबाद जिल्ह्यासह मराठवाड्यात गुरूवारी ७६३ कोरोनाबाधित आढळले असून २२ जणांचा मृत्यू झाला. नांदेडमध्ये १५९, लातूरमध्ये १४३, उस्मानाबाद येथे १०२, बीड येथे ९४, जालना येथे ६७, परभणी येथे ४६ तर हिंगोली येथे १५ रूग्ण आढळून आले.