शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
5
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
6
केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
7
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
8
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
9
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
10
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
11
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
12
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
14
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
15
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
16
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
17
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
18
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
19
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
20
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य

मोसंबीचा विमा अडकला तांत्रिक मुद्यात

By admin | Published: August 26, 2015 11:58 PM

जालना : मोसंबीचा विमा तांत्रिक मुद्यात अडकल्याने शेकडो शेतकरी विम्याच्या लाभापासून वंचित राहिल्याचे उघडकीस आले आहे.

जालना : मोसंबीचा विमा तांत्रिक मुद्यात अडकल्याने शेकडो शेतकरी विम्याच्या लाभापासून वंचित राहिल्याचे उघडकीस आले आहे. जिल्ह्यातील मोसंबी उत्पादकांनी अवेळी पडणारा पाऊस, वाढणारे उष्ण तापमान यापासून बचाव व्हावा म्हणून मोसंबीसह इतर फळ पिकांचा लाखो रुपयांचा विमा भरला होता. मात्र यातील बहुतांश शेतकऱ्यांना हवामान यंत्रात नोंद न झाल्याचे कारण पुढे करीत विमा नाकारण्यात आला आहे. प्रत्यक्षात मोसंबीसह इतर फळपिकांचे नुकसान झालेले आहे. तीन वर्षांपूर्वी शासनाने फळपीक विमा योजना लागू केली. २०१३-२०१४ मध्ये अंबिया बहारासाठी ४९ महसूल मंडळातील फक्त ३० मंडळातील शेतकऱ्यांना काहीअंशी विमा मिळाला. १९ मंडळात तशा प्रकारचे हवामानच निर्माण झाले नसल्याचे अ‍ॅटोमॅटिक वेदर मशीन्सने नोंदविले. संबंधित विमा कंपनीने हा निकषच समोर ठेवून १९ मंडळातील शेतकऱ्यांना पीक नाकारला. विशेष म्हणजे २०१२-१३ मध्ये ४ हजार शेतकऱ्यांनी मोसंबीचा विमा भराला होता. प्रति हेक्टरी ३६०० रुपये या प्रमाणे सुमारे ४ कोटी रुपयांचा भरणा केला होता. अंबिया बहरासाठी हा विमा भरण्यात आला होता. संबंधित विमा कंपनीकडे हा विमा अडकल्याचे उत्पादकांचे म्हणणे आहे. २०१४ मध्ये २८५ शेतकऱ्यांनी २५७ हेक्टरसाठी विमा भरला होता. यापैकी १२२ शेतकऱ्यांना ७६. ५६ लाखांचा विमा वाटप करण्यात आला. उर्वरित शेतकऱ्यांना निकषाचा फटका बसला.जिल्हा कृषी अधीक्षक दशरथ तांभाळे म्हणाले, फळपिकांच्या विम्यासाठी काही प्रमाणके आहेत. त्यानुसारच विमा देण्यात येतो. काही ठिकाणी तांत्रिक मुद्दे असले तरी प्रमाणकांचा निकषच संबंधित विमा कंपनी ग्राह्य धरते. (प्रतिनिधी)शासनाने फळपिकांसाठी अवेळी पाऊस, अति तापमान, कमी तापमान हे निकष लावले आहेत. ते राज्यस्तरावरील आहेत. मराठवाड्यातील फळबागांसाठी येथील वातावरणाचा परिपूर्ण अभ्यास करुन अथवा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील हवामान केंद्रातील निकष लावावेत अशी मागणी मोसंबी उत्पादक संघाचे राज्य अध्यक्ष भगवानराव डोंगरे यांनी केली. २०१२-१३ मध्ये भरलेला विमाही अशाच तांत्रिक मुद्यात अडकला आहे. तत्कलिन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी हा विमा तत्काळ देण्याचे आदेशही दिले होते. मात्र लोकसभा निवडणुका लागल्याने प्रश्न पुन्हा प्रलंबितच राहिला.नुकसान भरपाई ठरविण्याचा आरखडा मागील २५ वर्षांचा हवामानाच्या आकडेवारीचा विचार करण्यात आलेला आहे. त्यानुसार मोसंबी तसेच इतर फळपिकांसाठी प्रमाणके (ट्रिगर) निश्चित केले आहेत. संदर्भ हवामान केंद्रातील नोंदणीप्रमाणे विमा निश्चित होणार होता. मात्र जालना जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी लावलेल्या यंत्रात या नोंदी झाल्या नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.४विशेष म्हणजे शासनाच्या परिपत्रकात नमूद केले आहे की, एखाद्या महसूल मंडळात लावलेल्या हवामान केंद्रामार्फत काही कारणास्तव आकडेवारी प्राप्त झाली नाही तर त्या कालावधीपुरती पर्यायी शासनाच्या कृषी विद्यापीठे, विज्ञान केंद्र हवामान केंद्राची आकडेवारी विचारात घेऊन देय विमा रक्कम निश्चित करावी. असे असले तरी याकडे दुर्लक्ष झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.