लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : औरंगाबाद व पैठण तालुक्यांत मोठ्या प्रमाणात मोसंबी, डाळिंब व टोमॅटोचे उत्पादन होते. येथील उत्पादकांना परजिल्ह्यातील बाजारपेठेत जाऊन माल विक्री करावा लागतो. मात्र, आता करमाड येथेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेवर ७ एकरांमध्ये अडत बाजार उभारण्यात येणार आहे. यामुळे परपेठेतील खरेदीदार येथे येतील व थेट खरेदी करतील. यामुळे उत्पादकांना वाहतूक खर्च वाचेल व स्पर्धा वाढल्याने भावही चांगला मिळेल.जाधववाडी येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ अडत बाजारात २००१ या वर्षी मोसंबीची टनाने विक्री सुरू करण्यात आली होती. त्यावेळी जिल्ह्यातील मोसंबी जाधववाडीत दररोज ७० ते १५० टन विक्रीला येत असत. मात्र, नंतर जालना व पाचोड येथे मोसंबीचे मार्केट तयार झाले. तिथे परपेठेतील खरेदीदारांची संख्या वाढली. जाधववाडीपेक्षा जास्त भाव शेतकºयांना तिथे मिळू लागला. परिणामी, जाधववाडीतील मोसंबीच्या आवकीवर झाला. शहरात वाढत्या रहदारीमुळे मोसंबीच्या बागेपासून जाधववाडीतील अडत बाजारात टेम्पो आणणे कठीण झाले. जागोजागी पोलीस टेम्पोला अडवत असत. यामुळे मोसंबीने भरून येणाºया टेम्पोचे प्रमाण घटले. बाजार समितीची करमाड येथे जालना रोडलगतच ८ एकर जागा आहे. तिथे उपबाजार घोषित करण्यात आला आहे. या जागेचा विकास करण्यासाठी मागील दोन ते तीन वर्षांपासून संचालक मंडळ प्रयत्न करीत आहेत. ८ एकरांपैकी १ एकर जागा कृषी पणन मंडळाला देण्यात आली आहे. तिथे पणन मंडळाने गोदाम उभारले आहे. उर्वरित ७ एकर जागेचा विकास आराखडा बाजार समितीने तयार केलाआहे.येथे ७ एकरांवर बाहेरील बाजूस व्यावसायिक दुकाने उभारण्यात येणार आहेत. त्यातून मिळणा-या रकमेतून आतील बाजूस मोसंबी, डाळिंब व टोमॅटोचा अडत बाजार सुरू करण्यात येणार आहे. याशिवाय सेल हॉल, शीतगृह उभारणे, भुईकाटा उभारणे, शीतगृह, शेतकरी भवन, शेतकरी निवास, हमाल भवन, बाजार समितीची इमारत, सुलभ शौचालय आदी उभारण्यात येणार आहे. करमाडला अडत बाजार झाल्यास शेतक-यांना मोठी सुविधा निर्माण होईल व बाजार समितीचे उत्पन्नही वाढेल.
करमाडमध्ये मोसंबी, डाळिंबाचा अडत बाजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2017 1:36 AM