शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
3
मजबूत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी; IT, बँकिंग शेअर्समध्ये मोठी खरेदी
4
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
5
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
6
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
7
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
8
खोटे आरोप करून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न : अजित पवार 
9
स्वेच्छानिवृत्ती किंवा बदली; तिरुपती बालाजी मंदिरातील गैर-हिंदू कर्मचाऱ्यांना स्पष्ट निर्देश
10
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
11
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
12
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
13
नवीन कथेसह दाखल झाला 'कांतारा २'चा टीझर, शिव रुपात दिसला ऋषभ शेट्टी
14
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
17
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
18
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
19
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
20
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन

मोसंबीची झाडे अचानक पिवळी पडली; अज्ञात रोगाने फळबाग शेतकरी हवालदिल

By साहेबराव हिवराळे | Published: December 22, 2023 3:28 PM

आधीच दुष्काळ, त्यात रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

लाडसावंगी ( छत्रपती संभाजीनगर): मोसंबी पिकावर अज्ञात रोग पडल्याने झाडे पिवळी पडून वाळत असल्याने फळबाग शेतकरी हवालदिल झाला आहे. आधीच दुष्काळ, त्यात रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

छत्रपती संभाजीनगर तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला. मात्र उपाययोजना, शेतकऱ्यांना मदतीसाठी अद्याप प्रशासन सरसावले नाही. लाडसावंगी परिसर मोसंबी फळबागांचे माहेरघर असल्याने परिसरात मोसंबी फळबाग शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. गेल्या महिनाभरापासून मोसंबीची झाडे पिवळी पडून झाड कालांतराने पानगळ होऊन झाडे वाळून गेली आहेत. एकीकडे मोसंबी बागेला पाच वर्षांनंतर फळे धरतात, पाच वर्षे जीव लावून झाडे जगवली. ऐन फळबाग शेतकऱ्यांना उत्पन्न देण्याच्या तयारीत असताना झाडावर अज्ञात रोग पडत आहे.

आणखी सहा महिने फळबागा जगवण्याची कसरत शेतकऱ्यांना करावी लागणार आहे. जानेवारीनंतर फळबाग शेतकऱ्यांना टँकरद्वारे पाणी टाकून झाडे जगवण्याची कसरत करावी लागणार आहे. एवढे करूनही फळबाग वाचेल याची शाश्वती नाही. त्यात फळबागांवर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव वाढत जात आहे.

पंधरा दिवसांपासून झाडे पिवळीपाचशे मोसंबीची बाग असून गेल्या पंधरा दिवसांपासून झाडे पिवळी पडून पानगळ होत आहे. मी दहा दिवसांत दोन वेळा कीटकनाशक फवारणी केली व ठिबकमधून रासायनिक खताचा डोस दिला; मात्र यापूर्वी मोसंबीवर असा रोग पाहायला मिळाला नाही.- बाबासाहेब पडूळ शेतकरी

कीटकनाशकाचा डोस द्या..आधी पाण्याची कमतरता, नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात जोरदार पाऊस, ढगाळ वातावरणामुळे मोसंबी पिकावर मावा व जमिनीत बुरशी तयार झाल्याने मोसंबीची झाडे पिवळी पडत आहेत. जमिनीत हुमनी तयार झाली असल्याने कीटकनाशक फवारणी, जमिनीतून कीटकनाशकाचा डोस दिल्यास रोग पंधरा दिवसांत कमी होऊन झाडे हिरवेगार होतील.-सुधाकर पाटील, कृषी सहायक, लाडसावंगी

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रAurangabadऔरंगाबाद