शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

वैजापूर तालुक्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 4:04 AM

औरंगाबाद तालुक्यालाही टाकले मागे ः तीन अंकी वाढ सुरुच, गंगापूर, कन्नड, पैठण तालुक्यांचाही आलेख वाढता --- योगेश पायघन औरंगाबाद ...

औरंगाबाद तालुक्यालाही टाकले मागे ः तीन अंकी वाढ सुरुच, गंगापूर, कन्नड, पैठण तालुक्यांचाही आलेख वाढता

---

योगेश पायघन

औरंगाबाद : शहरातील कोरोनाबाधितांपेक्षा ग्रामीण भागातील आकडा दिवसेंदिवस झपाट्याने वाढतो आहे. आतापर्यंत औरंगाबाद तालुक्यात सर्वाधिक बाधित रुग्ण होते; मात्र आता वैजापूर तालुक्यात सर्वाधिक १,८५२ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. एकूण सक्रिय रुग्णांमध्येही शहरातील ४३.०५ टक्के तर ग्रामीणमधील ५६.९४ टक्के रुग्ण असून ग्रामीणमधील वाढती रुग्णसंख्या चिंतेचे कारण बनली आहे. त्यातही गंगापूर, कन्नड, पैठण तालुक्यातील होणारी दररोजची तीनअंकी वाढ सक्रिय रुग्णांत मोठी भर घालत असताना ग्रामीणमधील आरोग्य व्यवस्था अपुरी पडत असल्याने रुग्णांसह नातेवाईकांची खाटांची शोधाशोध करताना तारांबळ उडते आहे.

जिल्हा परिषदेने तपासणी वाढवण्यासाठी गावनिहाय दक्षता समित्यांचे गठण करुन एका बाधितांच्या संपर्कातील २० जणांच्या तपासणीसाठी प्रयत्न सुरु केले आहेत. परिणामी तपासणी वाढून दररोज सहाशेहून अधिक बाधित ग्रामीण भागात आढळत आहेत. ग्रामीणमधील शहरी व बाजारपेठांच्या गावात संसर्ग अधिक होता; मात्र आता अंतर्गत, दुर्गम भागातही कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. लवकर निदान करुन उपचार सुरु केल्यास वाढता मृत्यूदर रोखता येतो. त्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. मंगेश गोंदावले यासाठी प्रयत्नशील आहे. तसेच जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या तसेच जिल्हा शल्यचिकित्सकांची यंत्रणा लसीकरण वाढवण्यावर लक्ष केंद्रीत करत असताना लसींचा मागणीपेक्षा कमी होणारा पुरवठा लसीकरण वाढवण्यात बाधा ठरत आहे.

---

कोरोनामुक्त २१५ गावे संक्रमणापासून वाचवण्याचे प्रयत्न

---

जिल्ह्यात १३६८ गावांपैकी केवळ २१५ गावे आतापर्यंत कोरोनामुक्त राहिली आहेत. त्यात औरंगाबाद तालुक्यात २८, गंगापूर तालुक्यात ५८, कन्नडमध्ये ४४, खुलताबादमध्ये १७, पैठणमध्ये २९, फुलंब्रीत ७, सिल्लोडमध्ये १०, सोयगावमध्ये १६ तर वैजापूरमध्ये सर्वात कमी ६ गावे कोरोनामुक्त आहेत. ही २१५ गावे कोरोनामुक्त ठेवून येथील लसीकरणाला गती देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे प्रयत्न असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. सुधाकर शेळके यांनी सांगितले.

---

८६४४ (५६.९४ टक्के)

ग्रामीणमधील सक्रिय रुग्ण

६५३५ (४३.०५ टक्के)

शहरातील सक्रिय रुग्ण

---

तालुक्यांचा वाढता आलेख

---

तालुका -२० एप्रिल -२१ एप्रिल - २२ एप्रिल -२३ एप्रिल -सक्रिय रुग्ण

औरंगाबाद -९० -९८ -११७ -१३२ -१६३६

फुलंब्री -३१ -२४ -३७ -१८ -३५२

गंगापूर -१३९ -६६ -१३१ -२०२ -१३२६

कन्नड -२६ -६८ -१२२ -७५ -१२५५

खुलताबाद -१५ -२५ -१४ -१७ -२२०

सिल्लोड -३७ -९६ -५४ -११५ -७११

वैजापूर -१३७ -१५३ -१९३ -१७४ -१८५२

पैठण -१०५ -७७ -१५४ -१५५ -१०९५

सोयगाव -२५ -१६ -२५ -९ -१९७

एकूण -७०६ -६२३ -८४६ -८९७ -८६४४