लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मराठवाड्यातील बहुतांश लहान, मध्यम व मोठे प्रकल्प तळाला गेले आहेत. मे/वैशाख महिन्यांत उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. विभागातील सर्व प्रकल्पांत १९ टक्के पाणीसाठी शिल्लक राहिला आहे. पावसाळा सुरू होण्यास अद्याप महिनाभराचा अवधी आहे. त्यामुळे हा महिना मराठवाड्यासाठी त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे.टँकरचा आकडा ७०० पर्यंत गेला असून, आजवरच्या उन्हाळ्यात सर्वाधिक टँकरची संख्या कमी असली तरी विभागातील चार जिल्ह्यांमध्ये पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते आहे. १० लाख नागरिकांची तहान टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहे. या आठवड्याच्या अखेरीस ११ मोठ्या प्रकल्पांत उपयुक्त २१.६३ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याचा अहवाल पाटबंधारे खात्याने दिला आहे.७५ मध्यम प्रकल्पांत १८.४६ टक्के, ७४६ लघु प्रकल्पांत १०.५३ टक्के पाणीसाठा आहे. गोदावरी नदीवरील ११ बंधाऱ्यांमध्ये २४.५३ टक्के, तर तेरणा, मांजरा, पूर्णा नदीवरील २४ प्रकल्पांत २२.६४ टक्के पाणीसाठी शिल्लक आहे. सद्य:स्थितीत विभागातील ८६७ प्रकल्पांत १९ टक्के पाणीसाठाआहे.मध्यम प्रकल्प १० टक्क्यांनी आटलेविभागातील ७५ मध्यम प्रकल्पांत मागील वर्षी याच तारखेपर्यंत २९ टक्के पाणीसाठा होता. आजघडीला १९ टक्के पाणीसाठा आहे. १० टक्क्यांनी मध्यम प्रकल्प आटले आहेत. १० टक्के पाणी त्या प्रकल्पात असते, तर नागरिकांवर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली नसती. मोठ्या प्रकल्पांत गतवर्षी ७० टक्के पाणीसाठा होता. यावर्षी ते प्रमाण २१ टक्क्यांवर आले आहे. यावर्षी ३९ टक्के मोठ्या प्रकल्पांत पाणी नाही. त्यामुळे विभागात विदारक असे चित्र आहे.
मराठवाड्यातील बहुतांश धरणे तळाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 1:27 AM
मराठवाड्यातील बहुतांश लहान, मध्यम व मोठे प्रकल्प तळाला गेले आहेत. मे/वैशाख महिन्यांत उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. विभागातील सर्व प्रकल्पांत १९ टक्के पाणीसाठी शिल्लक राहिला आहे.
ठळक मुद्दे१९ % पाणी शिल्लक : वैशाखात पारा चढल्यामुळे नागरिकांची वणवण