शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

एक महिन्याच्या बालिकेस नालीत ठेवून माता पसार..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 12:07 AM

शहरातील अतिशय गजबजलेल्या लोहिया मैदान या बाजारपेठेच्या भागातील एक महिन्याच्या बालिकसे नालीत ठेवून निर्दयी माता पसार झाल्याची ठटना १७ आॅगस्ट रोजी दुपारी २ च्या दरम्यान उघडकीस आली. दरम्यान, आई- वडिलांनी पोलिस ठाणे गाठून मुलीला ताब्यात घेतल्याने या प्रकरणावर सायंकाळी उशिरा पडदा पडला

लोकमत न्यूज नेटवर्कदेगलूर : शहरातील अतिशय गजबजलेल्या लोहिया मैदान या बाजारपेठेच्या भागातील एक महिन्याच्या बालिकसे नालीत ठेवून निर्दयी माता पसार झाल्याची ठटना १७ आॅगस्ट रोजी दुपारी २ च्या दरम्यान उघडकीस आली. दरम्यान, आई- वडिलांनी पोलिस ठाणे गाठून मुलीला ताब्यात घेतल्याने या प्रकरणावर सायंकाळी उशिरा पडदा पडला.देगलूर शहराच्या विविध वसाहतीचे सांडपाणी लोहिया मैदान परिसरातील मोठ्या नाल्यातून नदीपात्रात जाते. पाण्याचा मोठ्या प्रवाहात मुलगी वाहून जाईल, या हेतूने येथे सोडून जाण्याचे कृत्य केले असावे असे दिसते. गुरुवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास लहान मुलाच्या सततच्या रडण्याच्या आवाज ऐकून तेथील दुकानदार सतर्क झाले व त्यांनी शोध घेतला असता नालीमध्ये स्त्री जातीचे मूल असल्याचे आढळून आले. ते मूल बाहेर काढून काही महिलांच्या मदतीने आंघोळ व कपडे घालून रुपेश काशेटवार, राजेश आऊलवार, दिगंबर कौरवार, माधव पाटील पाळेकर, बजरंग दासरवार, भीमराव बोरगावकर, गजानन गोपछेडे यांनी पोलिस ठाण्यात नेले. पोलिसांच्या सूचनेनुसार या मुलीस उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी बेंदीगुडे व परिचारिका सुभद्रा पडलवार, सुकेशिनी ढवळे, वर्षा मगडेवार यांनी उपचार केले. ही बालिका बºयाच वेळेपासून भुकेली असल्याने तिला कोणते दूध पाजवावे? या विवंचनेत वैद्यकीय कर्मचारी वर्ग असताना प्रकरणाच्या कार्यवाहीसाठी आलेल्या महिला कॉन्स्टेबल सावित्री हणमंते यांचे मातृत्व जागे होवून त्यांनी आपल्या अंगावरील दूध पाजताच मूल शांत झाले. ही घटना ज्या ठिकाणी झाली तेथील दुकानांच्या सीसीटीव्ही कॅमेºयात मूल नालीत ठेवतानाचे दृश्य कैद झाले. मुलीस नांदेडच्या शिशुगृहात हलवित असताना सायंकाळी ६ च्या दरम्यान नगरसेवक अ‍ॅड. अंकुश देसाई यांना सोबत घेवून मारोती कोंडेकर व मावशी उपजिल्हा रुग्णालयात पोहोचले. कोंडेकर यांनी ही मुलगी माझी आहे, असे सांगून ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. पोलिस ठाण्यातही जावून त्यांनी मुली माझीच आहे, असे सांगितले.