शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
4
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
5
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
6
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
7
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
9
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
10
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
11
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
13
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
14
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
15
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
16
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
17
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
18
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
19
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
20
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष

आंदोलन, उपोषणाने गाजला मंगळवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2016 12:10 AM

बीड : येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी सकाळपासून विविध संघटनांच्या वतीने प्रलंबित मागण्यांसाठी उपोषणे करण्यात आली,

बीड : येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी सकाळपासून विविध संघटनांच्या वतीने प्रलंबित मागण्यांसाठी उपोषणे करण्यात आली, तर अनेक वर्षांपासून वेतन रखडल्याने शिक्षकांनीही ठिय्या मांडला होता. घोषणाबाजी व निदर्शनांमुळे कार्यालय परिसर दणाणून गेला होता.कर्जमाफीची मागणीपरवानाधारक सावकारांकडून कर्जमाफी आलेली असतानादेखील रक्कम मिळत नसल्याने धारूर तालुक्यातील गावंदरा येथील मधुकर मारुती घुले या शेतकऱ्याने उपोषण केले सुरू केले आहे. कर्जरकमेतील ९५ हजार ४५१ रुपये शासनाने परवानाधारक सावकारांना दिलेले असतानाही केवळ ५५ हजार रुपयांची रक्कम माफ झाल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी चौकशी करून न्याय देण्याची मागणी घुले यांनी केली आहे.शिक्षकाचे वेतन रखडलेपरळी येथील वीरभद्रेश्वर प्राथमिक विद्यालयात सहशिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या जगन्नाथ भगवंतराव वाकडे यांचे थकीत वेतन, बिलातील फरक, वेतनवाढ, वेतनभत्ते, तसेच २००६ पासूनचा कायम मान्यतेबाबतचा निर्णय रखडल्याने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. मागण्या मान्य करून न्याय देण्याची मागणी त्यांनी केली आहे. यासंबंधी शिक्षण उपसंचालक, जिल्हाधिकारी कार्यालय, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक कार्यालय यांनाही निवेदन दिले आहे.शेतमजूर युनियनजिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात रोजगार हमी योजनेची कामे त्वरित सुरू करून मजुरांना ३०० रुपये रोजगार द्यावा, धारुर नगर पंचायतीमधील बंद असलेली कामे सुरू करावीत, अंबाजोगाई तालुक्यातील टाकरवण, मोहा, पाटोदा येथील मजुरांचे थकित वेतन त्वरित अदा करावे, अन्न सुरक्षा योजनेपासून वंचित असलेल्या शेतमजुरांचा यादीत समावेश करावा, तसेच वृद्ध निराधारांच्या निवृत्ती वेतनातील ४०० रुपये फरकाची रक्कम त्वरित वाटप करावी, या मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. गटविकास अधिकारी, तहसीलदार यांच्या दुर्लक्षामुळेच रोहयोची कामे रखडली असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. कॉ. सय्यद रज्जाक, बाबासाहेब सरवदे, बळीराम भुंबे, सुदाम शिंदे आदी उपस्थित होते. शिवाय शेतमजुरांसाठी कल्याणकारी बोर्ड स्थापन करुन बेघर असणाऱ्यांना त्याचे वाटप करण्यात यावे, दीडशे दिवसांपेक्षा जास्त रोहयोवर काम केलेल्या मजुरांची नावे मस्टरवर घेतली जात नाहीत, यामध्ये नियमितता आणण्याची मागणी शेतमजुरांनी केली आहे.कारवाईची मागणीमाजलगाव पंचायत समितीच्या इमारत बांधकामात कनिष्ठ अभियंता व गटविकास अधिकाऱ्यांच्या संगनमताने लाखोंचा अपहार झाला आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांचे चालू वेतन बंद करून कारवाई करण्याची मागणी शेख जुनैद शेख निजाम व इतर नागरिकांनी केली आहे. मागण्यांचे निवेदनही देण्यात आले. (प्रतिनिधी)स्टुडंट फेडरेशन आॅफ इंडिया जिल्हा कमिटीच्या वतीने दुष्काळी परिस्थितीमुळे शैक्षणिक शुल्क माफ करावे, पुढील वर्षी विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मिळावा या मागण्यांसाठी व कन्हैया कुमारच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले. त्याचप्रमाणे आयुक्तालयासमोरील आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांवर झालेले गुन्हे परत घेण्याची मागणी यावेळी एस.एफ.आय.च्या वतीने करण्यात आली. आंदोलनात रोहिदास जाधव, सुहास झोडगे, अमोल वाघमारे, सोपान भुंबे, लहू खारगे, गोविंद निरडे, रंगनाथ अडागळे, दत्ता सुरवसे, युवराज मांजरे, रजनीश पतंगे, सुहास विद्यागर उपस्थित होते.