फुलंब्री तालुक्यात यंदा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात टोमॅटोची लागवड केली हाेती. उत्पादनही मोठ्या प्रमाणात आले; परंतु, बाजारात टोमॅटोला कवडी मोल भाव मिळत आहे. बाजारात नेऊन विक्री करण्याइतका मोबदलासुद्धा मिळत नसल्याने शेतकरी संतापले असून त्यांनी अनेक ठिकाणी रस्त्यांवर टोमॅटो फेकून दिले. याबाबत ‘मनसे’ने मंगळवारी तहसील कार्यालयसमोर टोमॅटो गेटवर फेकून आंदोलन करत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपये अनुदान द्यावे, अशा मागणीचे निवेदन नायब तहसीलदार कापसे यांना दिले. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बबनराव जाधव, काकासाहेब जाधव, प्रद्युम काटकर, सागर कोलते, रोहित ठेंगे, ज्ञानेश्वर आहेर, शुभम बोरसे, भागीनाथ मालोदे, गणेश चव्हाण, जनार्दन पाठोळे, भाऊसाहेब तुपे आदी उपस्थित होते.
----- फोटो :
तहसील कार्यालयसमोर टोमॅटो फेकून आंदोलन करताना मनसेचे कार्यकर्ते.
140921\img-20210914-wa0159 (1).jpg
फुलंब्री तहसील कार्यालय समोर टमाटे फेकून आंदोलन करताना मनसे कार्यकर्ते