छत्रपती संभाजीनगर : एमआयएमचे उमेदवार खा. इम्तियाज जलील यांनी बुधवारी उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या शपथपत्रात स्थावर व जंगम मालमत्तेसह उत्पन्नाच्या स्रोतानुसार त्यांची कुटुंबासह असलेली संपत्ती ४ कोटी १५ लाख ४४ हजार १२२ रुपये असल्याचे दर्शविले आहे. त्यांच्या उत्पन्नाचा स्रोत शेती व मानधन आहे. पत्नी रुमी फातेमा यांच्या उत्पन्नाचा स्रोत शिकवणी असल्याचे त्यांनी शपथपत्रात म्हटले आहे. गेल्या निवडणुकीत २ कोटी ३५ लाखांची मालमत्ता असल्याचे जलील यांनी जाहीर केले होते.
खा. जलील यांच्या स्वत:कडे स्थावर व जंगम मालमत्ता मिळून ३ कोटी २४ लाख ३१ हजार १९० रुपयांची तर पत्नीकडे ९१ लाख ९ हजार ९३२ रुपयांची मालमत्ता आहे. शेती व बिगरशेती मालमत्तांचे विवरण त्यांनी उमेदवारी अर्जासोबत जोडले आहे. ७५ हजार रुपये जलील यांच्याकडे तर पत्नीकडे २५ हजार रुपये रोख रक्कम आहे. उद्धवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे व शिंदेसेनेचे उमेदवार पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्यापेक्षा जलील यांची संपत्ती कमीच असल्याचे दिसते आहे.
जंगम मालमत्ता किती?जलील यांच्याकडे किती?.................पत्नीकडे किती?१,०४,३४,१९० ...............२६,०९,९३२
स्थावर मालमत्ता किती?जलील यांच्याकडे किती? पत्नीकडे किती?२ कोटी २० लाख................... ६५ लाख
किती कर्ज आहे?जलील यांच्यावर विविध वित्त संस्थांचे २४ लाख ७४ हजार रुपयांचे कर्ज आहे. यात चारचाकीसाठी बँकेच्या कर्जाचा समावेश आहे. घरबांधणीसाठी व हातउसणे रक्कम कर्जरूपी असल्याचे त्यांनी शपथपत्रात म्हटले आहे. दोन चारचाकी व दोन दुचाकी त्यांच्याकडे आहेत.
८० ग्रॅम सोने आहे...सोने व मौल्यवान वस्तूंचे वजन आणि किमतीचा तपशील देताना जलील यांनी स्वत:कडे सोने नसल्याचे सांगितले आहे. तर पत्नीकडे २ लाख ७० हजार रुपयांचे ८० ग्रॅम सोने असल्याचे सांगितले आहे.
उमेदवार : खा. इम्तियाज जलीलपक्ष : एमआयएमवय : ५५शिक्षण : एम.कॉम, एम.बी.ए., एम.ए.सी.जे., डॉ.बा.आं.म.वि.गुन्हे : ४, शिक्षा नाही.