औरंगाबाद : औरंगाबाद जवळील करमाड येथे सटाणा शिवारात मालवाहू रेल्वेखाली येऊन १६ मजुरांच्या झालेल्या मृत्यूच्या घटनेची चौकशीसाठी मध्य प्रदेश येथून वरिष्ठ अधिकाऱ्यांचे एक पथक औरंगाबादमध्ये दाखल झाले आहे. यात ट्रायबल डेव्हलपमेंट मिनिस्टर मीना सिंघ, आयसीपी केसरी सिंघ, आयपीएस राजेश चावला आणि आणखी एक जणाचा यात समावेश आहे.
भोपाळ येथून एका चार्टर्ड विमानाने हे पथक दुपारी १ वाजता विमानतळावर दाखल झाले आहे. अपघाताविषयी हे पथक चौकशी करणार असल्याचे समजते. जालना येथील एका कंपनीत मध्य प्रदेश येथील १९ मजूर काम करतात. कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे हे मजूर जालना येथे अडकले गेले. दरम्यान, शासनाने परप्रांतीय मजुरांना घरी जाण्यासाठी विशेष रेल्वे सुरू केल्या आहेत, अशी माहिती या मजुरांना मिळाली. तसेच भुसावळ येथून मध्य प्रदेशला रेल्वे जाणार असल्याची माहिती या १९ मजुरांना मिळाली असता पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी ते रेल्वे रुळाच्या मार्गे औरंगाबादच्या दिशेने चालत निघाले. सटाणा परिसरात रात्री थकून हे मजूर रेल्वे रुळावर झोपले. शुक्रवारी पहाटे अचानक एक मालवाहू रेल्वे त्यांच्या दिशेने आली. काही कळायच्या आत १४ मजूर रेल्वे खाली चिरडले गेले, तर गंभीर जखमी दोघांचा उपचारासाठी रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. तर तिघे प्राण वाचविण्यात यशस्वी झाले आहेत.
औरंगाबाद रेल्वे अपघातातील मृतांची नाव :1)धनसिंग गोंड रा. अंतवळी जी. शाहडोल, राज्य - मध्य प्रदेश.2) निरवेश सिंग गोंड, अंतवळी जी. शाहडोल, मध्य प्रदेश3) बुद्धराज सिंग गोंड, रा. अंतवळी जी. शाहडोल, मध्य प्रदेश4) अच्छेलाल सिंग, चिल्हारी, मानपुर जी. उमरिया मध्य प्रदेश5) रबेंन्द्र सिंग गोंड, रा. अंतवळी, जी. शाहडोल, मध्य प्रदेश6) सुरेश सिंग कौल, जी. सडोळ, मध्य प्रदेश7) राजबोहरम पारस सिंग, रा. अंतवळी, जी. शाहडोल, मध्य प्रदेश8) धर्मेंद्रसिंग गोंड, रा. अंतवळी, जी. शाहडोल, मध्य प्रदेश9) बिगेंद्र सिंग चैनसिंग, रा. ममाज, तहसील पाळी, जी. उमरिया, मध्य प्रदेश10) प्रदीप सिंग गोंड, रा. जमडी, तहसील पाळी, जी. उमरिया, मध्य प्रदेश11) संतोष नापित, 12) ब्रिजेश भेयादीन रा. बहिरा इटोला, शहरगड चाटी, सहडोल.13) मुनीमसिंग शिवरतन सिंग, रा. नेवासा, पोस्ट, बकेली तहसली पाळी, जी. उमरिया.14) श्रीदयाल सिंग रा. अंतवळी जी. शाहडोल, मध्य प्रदेश15) नेमशाह सिंग चमदु सिंग, रा. नेवासा, पोस्ट बकेली, जी. उमरिया.16) दिपक सिंग अशोक सिंग गौड रा. अंतवळी जी. शाहडोल, मध्य प्रदेश---------------------जखमी व्यक्ती :1) सज्जनसिंग माखनसिंग धुर्वे, रा. पोंडी, ता. जुनावणी, जिल्हा मंडल खजेरीजिवंत प्रत्यक्षदर्शी मजूर:-1) इंद्रलाल कमलसिंग धुर्वे (वय 20 वर्ष), रा. पोवडी, ता. घोगरी, जिल्हा मांडला2) वेरेंद्रसिंग चेंनसिंग गौर (वय 27 वर्ष), रा. ममान, ता. पाली, जिल्हा उमरिया3) शिवमानसिंग हिरालाल गौर (वय 27 वर्ष) रा. शाहारगड, ता. शाही, जिल्हा शाहडोल