महामार्गावरील अपघातग्रस्तांना मृत्युंजय दूत यांनी कशा पद्धतीने मदत करायची आहे. अपघातानंतर जखमींसाठी जीवदान ठरणारे गोल्डन हॉवर्समध्ये कसे काम करावे, याचे प्रात्यक्षिक दाखवित मार्गदर्शन केले गेले.
मृत्युंजय दूतांना राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील हॉस्पिटल, रुग्णवाहिका यांचे संपर्क क्रमांक देण्यात आले. ‘स्व. बाळासाहेब ठाकरे अपघात विमा याेजना’संदर्भात माहिती देण्यात आली. प्रत्येकाला प्रथमोपचार पेटी देण्यात आली. यावेळी खुलताबाद पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार पडूळ, अमर आळंजकर, दीपेश सुरडकर, अभिजित गायकवाड, विनोद जारवाल, पोलीस मित्र शरद दळवी, रमेश धिवरे यांची उपस्थिती होती.
फोटो : वेरूळ येथील मृत्युंजय दूतांना प्रशिक्षण देताना सहायक पोलीस निरीक्षक सुरेश भाले, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. भाग्यश्री शेळके, डॉ. बलराज पांडवे, डॉ. श्रीकांत तुपेंसह आदी.