शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
3
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
4
सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
5
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
6
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
7
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
8
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
9
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
10
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
11
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
12
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
13
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
14
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
15
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
16
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
17
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
18
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
19
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
20
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?

स्वप्नील, इनायत यांच्या अष्टपैलू कामगिरीने एमएसईडीसीएल विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 12:52 AM

औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेच्या एन-२ येथील स्टेडियमवर सुरू असलेल्या व्हेरॉक करंडक औद्योगिक टष्ट्वेंटी-२० क्रिकेट स्पर्धेत स्वप्नील चव्हाण इनायत अली सय्यद यांच्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर एमएसडीसीएल संघाने बलाढ्य बँकर्स संघावर ७ धावांनी निसटती मात केली. दुसºया सामन्यात पीडब्ल्यूडी संघाने नीरज शिमरेच्या शानदार कामगिरीच्या बळावर मनपा संघावर ६ गडी राखून मात केली. अनुभवी दिनेश कुंटेची झुंजार फलंदाजी हेदेखील आज झालेल्या लढतीचे वैशिष्ट्य ठरले.

ठळक मुद्देइनायतच्या ९२ धावा : नीरज शिमरे चमकला

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेच्या एन-२ येथील स्टेडियमवर सुरू असलेल्या व्हेरॉक करंडक औद्योगिक टष्ट्वेंटी-२० क्रिकेट स्पर्धेत स्वप्नील चव्हाण इनायत अली सय्यद यांच्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर एमएसडीसीएल संघाने बलाढ्य बँकर्स संघावर ७ धावांनी निसटती मात केली. दुसºया सामन्यात पीडब्ल्यूडी संघाने नीरज शिमरेच्या शानदार कामगिरीच्या बळावर मनपा संघावर ६ गडी राखून मात केली. अनुभवी दिनेश कुंटेची झुंजार फलंदाजी हेदेखील आज झालेल्या लढतीचे वैशिष्ट्य ठरले.सकाळच्या सत्रात पीडब्ल्यूडी स्ट्रायकर्स संघाविरुद्ध मनपा संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ बाद १२७ धावा केल्या. त्यांच्याकडून दीपक जावळे याने २२ चेंडूंत ५ चौकार, एका षटकारासह सर्वाधिक २९ धावा केल्या. मोहंमद इम्रानने २४, प्रवीण क्षीरसागरने २७ व कर्मवीर लव्हेराने नाबाद १४ धावांचे योगदान दिले. पीडब्ल्यूडी स्ट्रायकर्सकडून नीरज शिमरे याने २९ धावांत ३ गडी बाद केले. रवींद्र तोंडे, श्याम टाकळकर व मनोज घोडके यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात पीडब्ल्यूडी स्ट्रायकर्स संघाने विजयी लक्ष्य १७ षटकांत ४ गडी गमावून १२९ धावा करीत पूर्ण केले. त्यांच्याकडून नीरज शिमरे याने २६ चेंडूंतच ४ चौकार व एका षटकारासह निर्णायक ४३ धावांची खेळी केली. योगेश राठीने नाबाद २३, रवींद्र तोंडेने २५ व मनोज घोडकेने २० धावांचे योगदान दिले.दुसºया सामन्यात एमएसईडीसीएल संघाने ५ बाद १७३ धावा फटकावल्या. त्यांच्याकडून इयानअली सय्यदने ५९ चेंडूंत ७ षटकार व ८ चौकारांसह नाबाद ९२ धावांची फटकेबाज खेळी केली. त्याला साथ देणाºया शैलीदार फलंदाज स्वप्नील चव्हाणने २७ चेंडूंत ६ चौकारांसह ४० व सचिन पाटीलने १६ धावांचे योगदान दिले. प्रत्युत्तरात कम्बाईन बँकर्सचा संघ ९ बाद १६६ पर्यंत मजल मारू शकला. त्यांच्याकडून अनुभवी फलंदाज दिनेश कुंटे याने एकाकी झुंज देत २६ चेंडूंत २ चौकार, २ षटकारांसह नाबाद ४० धावा केल्या. राजेश कीर्तिकरने १८ चेंडूंत ३ चौकार, ३ षटकारांसह ३६, दीपेश मद्दिने १४ चेंडूंत २१, प्रदीप जगदाळे व शेख हबीब यांनी प्रत्येकी १३ धावा केल्या. एमएसडीसीएलकडून स्वप्नील चव्हाणने २७ धावांत ४ गडी बाद केले. इनायत अली सय्यद व बाळासाहेब मगर यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.