लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांना नवीन वीजजोडणी हवी असल्यास त्या ग्राहकांसाठी 'कनेक्शनआॅन कॉल सेवा' महावितरणतर्फे सुरू करण्यात आलेली आहे.नवीन वीजजोडणी सुलभतेने मिळावी तसेच याबाबत तक्रार असल्यास ती तातडीने सोडविली जावी़ ग्राहकांच्या नावात बदल करणे सुलभ व्हावे यासाठी महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार यांच्या निर्देशानुसार मुंबई येथील प्रकाशगड मुख्यालयात एप्रिलपासून विशेष मदत कक्ष सुरू करण्यात आला आहे. ग्राहकांचा प्रतिसाद बघून या विशेष कक्षाची व्याप्ती आणखी वाढविण्यात आली आहे.नवीन वीजजोडणीसाठी ग्राहकांना महावितरणच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत होते़ त्यामुळे आर्थिक आणि मानसिक त्रासही सहन करावा लागत असे़ नवीन वीजजोडणी हवी असलेल्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकाने मुख्यालयातील मदत कक्षाला दूरध्वनी केल्यानंतर त्या कक्षातील कर्मचारी या ग्राहकाची माहिती घेतील.त्यानंतर या कक्षामार्फत संबंधित कार्यालयाला कळविण्यात येईल. त्यानुसार त्या कार्यालयातील कर्मचारी वीज जोडणीसाठी लागणारा अर्ज घेऊन स्वत: त्या ग्राहकाच्या घरी जातील़ तसेच लगेच वीजजोडणी देण्यासाठी प्रयत्न करतील़ अशी ही योजना आहे़
महावितरणची वीज जोडणीसाठी घरपोच सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 12:36 AM