शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
2
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
3
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
4
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
5
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
6
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
7
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
8
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
9
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
10
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
11
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
12
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
13
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस 
14
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
15
महिला आणि पुरुषही का करतात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर...? सामोर आली दोन कारणं!
16
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
17
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
18
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
19
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
20
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान

कच्च्या रस्त्यावर गुडघाभर चिखल

By admin | Published: August 04, 2016 11:52 PM

तालखेड : ग्रामीण भागात रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झालेली असते. उन्हाळ्यात ग्रामस्थांना रस्त्याची अडचण जाणवते, मात्र पावसाळ्यात कच्च्या रस्त्यावरुन गावाबाहेर पडणेही मुश्कील बनते

तालखेड : ग्रामीण भागात रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झालेली असते. उन्हाळ्यात ग्रामस्थांना रस्त्याची अडचण जाणवते, मात्र पावसाळ्यात कच्च्या रस्त्यावरुन गावाबाहेर पडणेही मुश्कील बनते. माजलगाव तालुक्यातील तालखेडनजीक असलेल्या जामगातांडा रस्त्याची दुरवस्था झाली असून, विद्यार्थ्यांना या कच्च्या रस्त्यावरुन चिखल तुडवत ४ ते ५ कि.मी. पायी जावे लागते. हा प्रवास पावसाळा सुरू झाल्यापासून संपेपर्यंत चालूच असतो. माजलगाव तालुक्यातील जामगातांडा रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या तांड्यावर जवळपास पाचशे उंबरठे आहेत. तालखेड ग्रामपंचायतअंतर्गत हा तांडा येतो. तांड्यावर राहणाऱ्या ग्रामस्थांना वाहतुकीसाठी चांगला रस्ता नाही. कच्च्या रस्त्यावरुन त्यांना यावे-जावे लागते. सध्या माजलगाव तालुका परिसरात चांगला पाऊस होत आहे. नुकत्याच झालेल्या पावसामुळे तांडा परिसरातील रस्ते चिखलमय झाले आहेत. ग्रामस्थ, विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहेत. एखाद्या रुग्णाला शहराच्या ठिकाणी असलेल्या दवाखान्यात न्यावयाचे असल्यास बाजेचा आधार घ्यावा लागतो. तांड्यावरील लोकांनी अनेकवेळा रस्त्याबाबत आग्रह धरला, मात्र त्याची दखल घेतली गेली नाही. अनेकवेळा आश्वासन देऊनही दुरुस्ती झाली नाही. दुरुस्तीची मागणी विलास जाधव, संजय पवार, राजू राठोड, शिवाजी जाधव यांनी केली. (वार्ताहर)