औरंगाबाद: रेल्वे राज्यमंत्री म्हणून मुंबई-अहमदाबाद आणि दिल्ली-वाराणसी बुलेट ट्रेनच्या धर्तीवर मुंबई ते नागपूर बुलेट ट्रेन सुरू करण्याचा विचार आहे. अभ्यासा अंती हा मार्ग होऊ शकतो असे निदर्शनास आले आहे. हा प्रकल्प माझ्या मनात असून तो पूर्ण करण्यास प्राधान्य राहील अशी माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे ( Raosaheb Danave ) यांनी दिली. (Raosaheb Danve's dream project Mumbai Nagpur Bullet Train )
रावसाहेब दानवे हे रेल्वे राज्यमंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर पहिल्यांदाच मराठवाड्यात आले आहेत. एका विशेष बोगीने त्यांचे औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर आज सकाळी त्यांचे आगमन झाले. यावेळी एका वृत्त वाहिनीशी बोलताना दानवे यांनी मुंबई-औरंगाबाद-नागपूर या मार्गावर बुलेट ट्रेन उभारण्याचा विचार बोलून दाखवला. रेल्वे मार्ग सुरु करण्यासाठी व्यवहार्यता महत्वाची आहे. खासदार किंवा मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार रेल्वेचे मार्ग बदलत नाहीत. मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनबाबतही अधिकाऱ्यांसोबत बैठक झाल्या. अभ्यासांती हा मार्ग व्होऊ शकतो असे निदर्शनास आले असल्याचे दानवे यांनी स्पष्ट केले. या नव्या बुलेट ट्रेनमुळे 'मुंबई ते औरंगाबाद' हे अंतर दीड ते पावणे दोन तासांवर येईल. असेच तीन ते साडेतीन तासांमध्ये मुंबईहून नागपूरला जाता येईल. या मार्गामुळे मराठवाडा आणि विदर्भाचा कायापालट होईल. यामुळेच हा प्रकल्प माझ्या मनात असल्याचेही दानवे यावेळी म्हणाले.
स्वागतासाठी कार्यकर्त्यांची लोटालोटीकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच रावसाहेब दानवे (Raosaheb Sangave) हे विशेष बोगीतून प्रवास करीत मंगळवारी सकाळी औरंगाबादरेल्वे स्टेशनवर दाखल झाले. त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांची एकच गर्दी झाली होती. पुष्पहार, पुष्पगुच्छ देण्यासाठी अक्षरशः लोटालोटी झाली.
'त्या' घोषणा मी ऐकल्याच नाही; बीड जिल्ह्यातील प्रकारावर मंत्री भागवत कराड यांचे पांघरूण