लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सिल्लोडमधील कत्तलखान्यांवरील धाडीनंतर अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. सिल्लोडसह तालुक्यातील अजिंठा, शिवना, बोरगाव बाजार ही गावे जनावरे कत्तलीचे प्रमुख अड्डे असून, दररोज या कत्तलखान्यांत जवळपास एक हजार जनावरांची कत्तल होते व या गोमांसाचा मुंबईतील प्रमुख कंपन्यांना पुरवठा केला जातो.शहरात व ग्रामीण भागात किरकोळ मांस विक्रीचा दर १६० रुपये, तर मुंबईला तो २०० रुपये किलो आहे. गोवंश हत्येवर सरकारने बंदी आणल्यापासून गोवंशाच्या मांसाला मागणी वाढली (पान २ वर)तालुक्यात छोटे-मोठे १७ कत्तलखानेसिल्लोड शहरातील पाचपैकी तीन कत्तलखान्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली असली तरी तालुक्यात आठ सर्कलमधील अजिंठा, शिवना, बोरगाव बाजार, अंभई, डोंगरगाव परिसरात छोटे-मोठे जवळपास १७ अवैध कत्तलखाने व विक्री केंद्रे आहेत.गोरगरिबांची जनावरे चोरून कत्तलखान्यातील मशीनमध्ये अवघ्या अर्ध्या ते एक तासात त्यांची विल्हेवाट लावली जाते. सिल्लोड तालुक्यातील मांस मुंबईला पोहोचल्यावर तेकंपनीकडून विदेशात पाठविले जाते. याशिवाय सिल्लोडचे काही छाटलेले मांसमालेगाव, हिंगोली व आंध्र प्रदेशमध्येही पाठविले जाते.मोठे रॅकेट; गुन्हा ६ जणांवर३ दिवसांपूर्वीच्या कारवाईत पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले असले तरी यात मोठे रॅकेट आहे. पोलिसांनी योग्य तपास केल्यास आरोपींची संख्या शेकडोमध्ये जाईल. आता पोलीस काय भूमिका घेतात, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.१०० रुपयांत गाडी पासज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मांसाची तस्करी होते त्यांचे हप्ते वाढीव असले तरी सिल्लोड, औरंगाबाद, चाकण, मुंबईपर्यंत असलेल्या रस्त्यांवर फिरणारे पोलीस केवळ ५० ते १०० रुपये एन्ट्री घेऊन वाहने सोडून देतात. त्यामुळे इतक्या दिवस हा ‘धंदा’ बिनधास्त सुरू होता.स्थानिक पोलिसांना हप्तेसिल्लोड तालुक्यातील पोलिसांसह वाहतूक, गुन्हे शाखेला महिन्याला लाखो रुपये हप्त्यापोटी ठरलेले आहेत. याशिवाय वाहतूक करताना कुणी वाहन अचानक पकडल्यास त्याची वेगळी ‘तोडपाणी’ केली जाते. अशा प्रकारे हा ‘धंदा’ बरकतीत आला आहे.
मुंबईतील कंपन्यांना सिल्लोडहून मांसपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 12:22 AM