औरंगाबाद : मनपा आयुक्त म्हणून डॉ. निपुण विनायक हे जेव्हा शहारात आले, तेव्हा कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून औरंगाबादकर त्यांना ओळखत होते. शहरात धडाडीने ते कामे करतील आणि औरंगाबादचा विकास होईल, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा होती; परंतु मनपात येणाऱ्या दलालांवर कारवाई करण्याऐवजी ते रडगाणे गात आहेत. कारवाईपासून दूर पळत आहेत. ही औरंगाबादसाठी चांगली गोष्ट नसल्याची चिंता सर्वसामान्यांबरोबर विविध क्षेत्रांतील व्यक्तींकडून व्यक्त होत आहे. डॉक्टर असलेल्या मनपा आयुक्तांनी किमान आतातरी महापालिकेत वाढलेल्या दलालरूपी रोगावर सर्जरी करावी, अशी मागणी होत आहे.महापालिकेतील अनेक कामे दलालांशिवाय होत नसल्याची प्रचीती नागरिकांना येते. त्यासंदर्भात अधिकाºयांना कल्पना असूनही काही कारवाई होत नसल्याचे मनपा आयुक्तांनी दोन दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्यातून समोर आले. मनपात समस्या घेऊन सर्वसामान्य नागरिक कमी येतात. दलालांचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे मी मुख्यालयात सहसा बसत नाही, असे मनपा आयुक्त म्हणतात; परंतु त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी कोणतेही पाऊल उचलत नाहीत. त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे का, हे त्यांनी जनतेला सांगावे. जनता नक्कीच त्यांच्या पाठीशी उभी राहील, असे मत विविध क्षेत्रांतील जाणकारांनी व्यक्त केले.लोकाभिमुखता वाढवावीदलालांची संख्या वाढली, हे मनपा आयुक्तांनी सांगितले; परंतु हे औरंगाबादकरांना नवीन नाही. केवळ त्यांच्या तोंडून आल्याने त्याला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे. त्यामुळे लोकाभिख कारभाराचा अभाव आहे. जनप्रतिनिधी आणि लोक यांच्यातही अंतर निर्माण झाले आहे, असा त्याचा अर्थ होता. त्यामुळे अधिक लोकाभिमुखता वाढविणे, लोकांची कामे नियमानुसार व्हावीत, यासाठी मनपा आयुक्तांनी प्रयत्न केले पाहिजे. कोणत्याही अडथळ्याशिवाय नागरिकांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.- अॅड. प्रदीप देशमुखकारभारावर लक्ष द्यावेमनपा प्रशासन आणि पदाधिकाºयांनी लक्ष घातले तर अशाप्रकारचे वातावरण निर्माण होणार नाही. त्यासाठी त्यांनी हातात हात घालून काम करणे गरजेचे आहे. प्रशासन व पदाधिकाºयांनी मनपाच्या कारभारावर व्यवस्थित लक्ष दिले तर दलालांना प्रवेशच मिळणार नाही. पूर्णवेळ कार्यालयात बसावे. त्यांनी कोणाचीही भीती बाळगू नये. पोलिसांत तक्रार करावी. जनता त्यांच्या पाठीशी राहील.- प्रमोद खैरनार, राज्य उपाध्यक्ष, के्रडाईराजीनामा द्यावाएखाद्या कामगाराने काम केले नाही तर वेतन दिले जात नाही. आयुक्त कामाच्या जागेवर बसत नसतील, तर त्यांचेही वेतन करता कामा नये. दलाली बंद करण्यासाठीच त्यांची नेमणूक केली आहे. ते होत नसेल तर राजीनामा दिला पाहिजे.- अॅड. अभय टाकसाळ, जिल्हा सहसचिव, भारतीय कम्युनिस्ट पक्षपारदर्शी यंत्रणा करावीमनपा आयुक्तांनी दलालांना नियंत्रित केले पाहिजे. हे त्यांच्या नियंत्रणाबाहेर आहे, अशी कोणतीही परिस्थिती नाही. नागरिकांचा त्रास कमी होईल, असा उद्देश ठेवून कामे केली पाहिजेत. नागरिकांची मनपातील कामे सुटसुटीत आणि सोप्या पद्धतीने होतील, अशी पारदर्शी यंत्रणा केली पाहिजे.- सुनील देशपांडे, माजी अध्यक्ष, आर्किटेक्ट असोसिएशनकठोर कारवाई करावीमनपात दलाल असतील तर त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मनपा आयुक्त आहेत. दलालांनी येऊ नये, यासाठी मनपा आयुक्तांनी खुर्चीवर बसले पाहिजे. दलाल येत असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे. त्यांच्यासह मोठ्या अधिकाºयांनी सर्वसामान्य जनतेसाठी किमान रोज दोन तास दिले पाहिजे.-प्रा. भारती भांडेकर, अध्यक्ष, जागृती मंचशहरासाठी योग्य नव्हेमनपा आयुक्त जे बोलले ते खरे आहे की खोटे हे त्यांनाच माहीत आहे; परंतु खड्डेमय रस्ते, जागोजागी पडलेला कचरा ही परिस्थिती पाहता महापालिकेकडून कोणतेही काम होत नसल्याचा प्रत्यय नागरिकांना येत आहे. तसाच प्रत्यय उद्योजकांना येत आहे. कोणतेही कार्यालय असो तेथे दलाल असतील तर औरंगाबादसाठी चांगली गोष्ट नाही.- मनीष अग्रवाल, जनपसंर्क अधिकारी, मसिआ
मनपा आयुक्त, आता दलालरूपी रोगावर सर्जरी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 11:28 PM
मनपा आयुक्त म्हणून डॉ. निपुण विनायक हे जेव्हा शहारात आले, तेव्हा कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून औरंगाबादकर त्यांना ओळखत होते. शहरात धडाडीने ते कामे करतील आणि औरंगाबादचा विकास होईल, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा होती; परंतु मनपात येणाऱ्या दलालांवर कारवाई करण्याऐवजी ते रडगाणे गात आहेत. कारवाईपासून दूर पळत आहेत. ही औरंगाबादसाठी चांगली गोष्ट नसल्याची चिंता सर्वसामान्यांबरोबर विविध क्षेत्रांतील व्यक्तींकडून व्यक्त होत आहे. डॉक्टर असलेल्या मनपा आयुक्तांनी किमान आतातरी महापालिकेत वाढलेल्या दलालरूपी रोगावर सर्जरी करावी, अशी मागणी होत आहे.
ठळक मुद्देकर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख जपावी : महापालिकेतील दलालीसंदर्भात विविध क्षेत्रांतील व्यक्तींमध्ये चिंता