शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
2
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
4
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
5
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
6
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
7
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
8
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
9
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
10
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
11
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
12
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
13
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
14
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
15
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
17
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 
18
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
19
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
20
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या

अवैध बांधकामे, कचरा पाहून महापालिका आयुक्तांचा संताप अनावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 7:03 PM

आरेफ कॉलनीत आयुक्तांची पाहणी

ठळक मुद्दे दोन अधिकाऱ्यांना निलंबनाचा इशाराखाम नदी स्वच्छ करा

औरंगाबाद : महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी सोमवारी पदभार स्वीकारला. पहिल्याच दिवशी त्यांनी आपल्याच अधिकाऱ्याला पाच हजार रुपयांचा दंड ठोठावून आपल्या कामाची पद्धत सांगितली. आज दुसऱ्या दिवशी आयुक्त थेट आरेफ कॉलनी वॉर्डात सकाळी ८.३० वाजता दाखल झाले. अवैध बांधकामे, जिकडे-तिकडे कचरा पाहून त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. अतिक्रमण विभागाचे एक पदनिर्देशित अधिकारी, वॉर्ड अधिकाऱ्यांना निलंबनाचा इशाराही त्यांनी दिला. त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

मंगळवारी सकाळी ८ वाजता आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय टाऊन हॉल येथील इमारतीजवळ दाखल झाले. कार उभी करून जॉगिंग ट्रॅकसुटवरच ते पायी आरेफ कॉलनी वॉर्डाकडे निघाले. सोबत मनपा अधिकाऱ्यांचा फौैजफाटाही होता. यामध्ये सहायक संचालक नगररचना आर. एस. महाजन, कर निर्धारक व संकलक अधिकारी करणकुमार चव्हाण, वॉर्ड अधिकारी संजय जक्कल, पदनिर्देशित अधिकारी वामन कांबळे, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता आय. बी. खाजा, घनकचरा विभागाचे नंदकिशोर भोंबे, नगररचना विभागाचे उपअभियंता संजय कोंबडे आदींचा समावेश होता. वॉर्डात पाय ठेवताच जिकडे-तिकडे कचरा, अवैैध बांधकामे आयुक्तांना दिसून आली. अनेक घरांमध्येच छोटेसे दुकानही थाटण्यात आल्याचे निदर्शनास आले. एका अवैैध बांधकामाच्या ठिकाणी त्यांनी बांधकाम परवानगी घेतली का? याची चौैकशी केली. मालमत्ताधारकाने कोणतीच बांधकाम परवानगी घेतली नव्हती. मालमत्ताधारक दुसऱ्या मजल्याचे काम करीत होता. जुन्या घराला किमान कर तरी लावलेला आहे का? याची शहानिशा केली. 

मनपाने करही लावला नसल्याचे आयुक्तांना कळाले. अतिक्रमण हटाव विभागाचे पदनिर्देशित अधिकारी वामन कांबळे यांना या सर्व प्रकाराबद्दल निलंबित करण्याचा इशारा त्यांनी दिला. त्यानंतर रस्त्यावरून जाताना जागोजागी कचऱ्याचे ढीग पाहताच या भागात स्वच्छता होत नाही का? प्लास्टिकचा सर्रासपणे वापर होत आहे. कचरा उचलून स्वच्छता करावी, कचरा टाकण्यासाठी डस्टबीन ठेवाव्यात, नागरिकांकडून डस्टबीनमध्ये कचरा टाकला जात नसेल तर त्यांना जागेवर दंड करावा, अशी सूचना केली. कचरा प्रश्नावर वॉर्ड अधिकारी जक्कल यांनाही निलंबनाचा इशारा दिला. मालमत्ता कर लावण्याची जबाबदारीही वॉर्ड अधिकाऱ्यांचीच आहे.

खाम नदी स्वच्छ कराआरेफ कॉलनीशेजारी असलेल्या खाम नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे करून बांधकामे झाल्याचे पाहून आयुक्त अधिकाऱ्यांवर चांगलेच भडकले. नदीपात्रात अतिक्रमण होताना कारवाई करता आली नाही का? असा प्रश्न उपस्थित करताच अधिकारी निरुत्तर झाले. नदीपात्रातील कचरा तातडीने उचलून नदीपात्र स्वच्छ करा, त्याकरिता जेसीबी न घेता दोन ते तीन कर्मचारी लावा, अशी सूचना केली. सायंकाळपर्यंत नदीपात्रातील एकाच भागात तीसुद्धा दर्शनी भागात स्वच्छता करण्यात आली.

कचरा वेचक, भंगारवाल्यांचे सहकार्य घ्याशहरात कचरा वेचक आणि भंगारवाले कचरा उचलण्यासाठी मदतगार ठरणारे आहेत. कचरा वेचकांच्या मदतीने कचऱ्याचे वर्गीकरण करता येते. तसेच भंगारवालेदेखील मदत करतात. त्यांच्यावर कारवाई न करता उलट त्यांना सहकार्य करा, अशी सूचना आयुक्तांनी केली.

आजपासून आयुक्त दुचाकीवर बुधवारपासून आयुक्त पाण्डेय दुचाकीवर वॉर्डात फिरणार आहेत. वॉर्ड अधिकारी, नगररचना अधिकारी, इमारत निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक, मालमत्ता अधिकारी, पाणीपुरवठा अभियंता, वॉर्ड अभियंता यांनी सोबत राहावे, अशी सूचना केली. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबाद