औरंगाबाद : शहराजवळील गावांना मनपाकडून पाणीपुरवठा करण्यात यावा, तसेच विविध विकासकामे रखडलेली असून, निधी उपलब्ध करून द्यावा. औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आ. हरिभाऊ बागडे यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनाद्वारे केली.
महानगरपालिका क्षेत्रात पिण्याच्या पाण्याची योजना राबविताना ज्या भागात अजून पाणीपुरवठा झाला नाही. तेथून सुरुवात करावी.
लगतच्या गावांना महानगरपालिकेकडून पाणी द्यावे. शहराच्या
सांडपाण्यामुळे तेथील पाणी दूषित झाले आहे.
स्मार्ट सिटीची डेव्हलपमेंटची कामे थांबली आहेत, महानगरपालिकेने आजपर्यंत स्वतःचा हिस्सा दिला नाही.
डी.पी. प्लॅनप्रमाणे डीपी. रोडच्या जागेवर महानगरपालिकेने बोर्ड लावले असते तर तिथे २०/३० प्लॉट पडले नसते, आता तरी ते करावे. शहर विकासासाठी ३ टोलनाके आहेत, तेथे टोल वसुली होते तो निधी दर वर्षी किती जमा होतो, सिडको महानगरपालिका क्षेत्राच्या बाहेरच्या प्राधिकरणात असलेल्या गावातील एन.ए. ४४ च्या
लेआऊटला मान्यता देते त्याचे सिडको बेटरमेंट चार्जेस घेते; पण तेथे विकास करीत नाही.
सिडकोचे हस्तांतरण महानगरपालिकेला झाले; पण घरे बांधताना आजही सिडकोची परवानगी घ्यावी लागते. त्यात विसंगती आहे ती कधी दूर होईल. महानगरपालिकेचा नियोजन आराखडा मंजूर नाही,
या मुद्यावर त्यांनी निवेदनात प्रकाश टाकला.