दुकानांना लावला ६० हजारांचा दंड
औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये दुकानांना सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या १० दुकानदारांकडून मनपाच्या पथकाने ६० हजार रुपये दंड वसूल केला. गुलमंडीतील बालाजी भांडारकडून पाच हजार रुपये, सरताज ट्रेडिंग चेलीपुराकडून पाच हजार रुपये, राजयोग ट्रेडर्सकडून पाच हजार रुपये, मणियार मार्केटकडून पाच हजार रुपये, टीव्ही सेंटर येथील कृष्णा पवार यांच्याकडून पाच हजार रुपये, स्टेशन रोड येथील दिनेश तनवाणी यांच्याकडून पाच हजार रुपये, रेणुका किराणा दुकान, चिकलठाणा रोड यांच्याकडून पाच हजार रुपये, गोमटेश मार्केट येथील बजाज कापड दुकानाकडून दहा हजार रुपये दंड वसूल केला.
सात प्रवासी पॉझिटिव्ह
औरंगाबाद : रेल्वेने आलेले सात प्रवासी पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांचा मनपाच्या आरोग्य पथकाने बुधवारी स्वॅब घेतला होता. गुरुवारी ८३ प्रवाशांची चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल शुक्रवारी मिळेल.
संचारबंदीत ६६ जणांची तपासणी
औरंगाबाद : संचारबंदीत नियमाचे उल्लंघन करून शहरात विनाकारण फिरणाऱ्या ६६ नागरिकांची अॅंन्टिजन चाचणी मनपा व पोलीस पथकाने केली. यात कोणीही नागरिक पॉझिटिव्ह आढळले नाहीत.
प्रवेश नाक्यांवर १८ पॉझिटिव्ह
औरंगाबाद : शहराच्या सहा प्रवेश नाक्यांवर गुरुवारी १८ जण पॉझिटिव्ह आढळले. त्यात चिकलठाणा येथे चार, हर्सूल टी पॉईंटवर चार, कांचनवाडी येथे सहा, दौलताबाद टी पॉईंट येथे एक, नगर नाका येथे तीनजण पॉझिटिव्ह आढळले. झाल्टा फाटा येथे १६६ जणांच्या चाचणीत कोणीही पॉझिटिव्ह आढळले नाही.