शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

महापालिकेच्या ‘कुरुक्षेत्र’ आखणीच्या हालचाली सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2019 6:55 PM

आता वॉर्डांऐवजी प्रभागानुसार होणार निवडणुका 

ठळक मुद्दे२०११ च्या लोकसंख्येवरच रचना या आठवड्यात आयोगाचे पत्र येणार 

- विकास राऊत 

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकांचे निकाल लागत नाहीत तोवरच आता औरंगाबाद शहरातील राजकीय वर्तुळात महापालिका निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. एप्रिल २०२० मध्ये महापालिका निवडणुका प्रस्तावित असून, यावेळी वॉर्डांऐवजी प्रभागनिहाय निवडणुका होणार आहेत.प्रभागांच्या रचनेसाठी २०११ ची लोकसंख्या गृहीत धरण्यात येणार आहे. प्रभाग आखणीसाठी नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महापालिका राज्य निवडणूक आयोगाकडून पत्र देण्यात येणार असल्याची माहिती आयोगाच्या वरिष्ठ सूत्रांनी ‘लोकमत’ला दिली. 

आयोगाच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले की, साधारणत: निवडणुकीच्या सहा महिन्यांपूर्वी आरक्षण आणि प्रभाग (बहुसदस्यीय पद्धती) रचनेला सुरुवात केली जाते. त्यानुसार औरंगाबाद महापालिकेची निवडणूक एप्रिल २०२० मध्ये होणार असल्यामुळे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पालिकेला प्रभाग, लोकसंख्या, आरक्षणाच्या अनुषंगाने पत्र देण्यात येईल. तीन किंवा चार वॉर्डांचा एक प्रभाग यानुसार रचना केली जाते. सम किंवा विषम संख्या, असा कुठलाही मुद्दा रचना आणि आखणीमध्ये नसतो. वॉर्डांच्या सीमा, लोकसंख्या याबाबत येत्या आठवड्यात आयोग पालिका प्रशासनाला पत्र देऊन अवगत करील. 

प्रभागरचनेचा एक फॉर्म्युला ठरलेला आहे. त्यानुसारच रचना केली जाते. मुंबई महापालिका वगळता राज्यात सर्व मनपांच्या निवडणुका प्रभाग पद्धतीने घेण्याबाबत विधिमंडळाचा कायदा आहे. त्यामुळे स्थानिक राजकीय नेत्यांनी कितीही दबाव आणला तरी त्यात बदल होऊन वॉर्डनिहाय रचना आता होणे शक्य नाही अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली. ३ नोव्हेंबरपर्यंत राज्य निवडणूक ंआयोगाचे पत्र येण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे. सदरील पत्रासोबत प्रभाग रचना कशी करायची याचा नमुना पाठविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

२०१५ मध्ये अशी झाली होती रचना २०१५ साली झालेल्या निवडणुकांसाठी जानेवारी २०१५ पर्यंत वॉर्डरचनेचे काम पूर्ण झाले होते. त्यानंतर सामाजिक आरक्षणानुसार वॉर्डांसाठी सोडत झाली होती. त्यामुळे यावेळीदेखील याच लगबगीने मनपा निवडणुका विभागाला काम करावे लागणार आहे. सध्या महापालिकेत ११५ वॉर्ड आहेत. यानुसार ३८ प्रभागांची रचना होईल. त्यात तीन सदस्यांचा एक प्रभाग असू शकेल.४ चार वॉर्डांचा मिळून एक प्रभाग करायचा म्हटल्यास २९ प्रभाग होणे शक्य आहे. २०१५ साली झालेल्या निवडणुकीसाठी २०११ च्या जनगणनेतील लोकसंख्येचा आधार घेण्यात आला होता. ११ लाख ७५ हजार ११६ एवढी लोकसंख्या त्यावर्षी समोर ठेवून वॉर्डांची आखणी झाली होती. मनपा निवडणुकीनंतर सातारा- देवळाई हे दोन वॉर्ड पालिकेत आले होते. त्यानंतर तिथे पोटनिवडणूक झाली होती.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाElectionनिवडणूकAurangabadऔरंगाबाद