शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल आला तरी महापालिका निवडणूक दिवाळीनंतरच शक्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 17:35 IST

ओबीसी आरक्षणाचा सर्वोच्च न्यायालयात निकाल लागला तरी प्रक्रियेला वेळ लागणार

छत्रपती संभाजीनगर : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर पुढील सुनावणी ४ मार्चला होईल, असे सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी स्पष्ट केले. त्यामुळे पुढील आठवड्यात आरक्षणासंदर्भात अंतिम निकाल आला तरी या उन्हाळ्यात (दि. ३१ मेपूर्वी) मनपा निवडणूक घेणे अशक्य आहे. राज्यातील सर्व महापालिकांच्या निवडणुका दिवाळीनंतरच होऊ शकतात, असे निवडणूक विभागातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

छत्रपती संभाजीनगर महापालिकेची निवडणूक मागील पाच वर्षांपासून झालेली नाही. दोन वेळेस निवडणूक घेण्यासंदर्भात राज्य निवडणूक विभागाने हालचाली केल्या. मात्र, निवडणूक घेतली नाही. ४ मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटला तरी ३१ मेपर्यंत निवडणूक घेणे शक्य नाही. ९० दिवसांत निवडणुकीची प्रक्रियाच होऊ शकत नाही, असे राज्य निवडणूक आयोगातील काही निवृत्त अधिकाऱ्यांनी नमूद केले. निवडणुकीसाठी प्रभाग तयार करणे, प्रारूप प्रभाग आराखडा प्रसिद्ध करणे, त्यावर सूचना हरकती मागविणे. त्यानंतर हा आराखडा अंतिम करण्यासाठी बराच कालावधी लागतो. पुढील महत्त्वाचा टप्पा म्हणजे निवडणूक कार्यक्रम किमान ४५ ते ५० दिवसांचा ठेवावा लागतो. कितीही जलद गतीने काम केले तर पुढील काही दिवसांत निवडणुका घेणे अशक्यप्राय असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सहा ते आठ महिने कालावधीसर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणासंदर्भात ४ मार्च रोजी निर्देश प्राप्त झाल्यानंतर राज्य शासनाला निर्णय घ्यावा लागेल. त्यानंतर राज्यातील सर्वच महापालिकांमध्ये पुढील प्रक्रिया सुरू करण्यासाठी निर्देश द्यावे लागतील. अत्यंत शांततेत ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी किमान सहा ते आठ महिन्यांचा अवधी हमखास लागतोच असे सूत्रांचे म्हणणे आहे.

इच्छुकांचे लक्ष ४ मार्चकडेमाजी नगरसेवकांसह विविध पक्षांतील कार्यकर्तेही निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. ४ मार्चला सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काय येईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरElectionनिवडणूक 2024Muncipal Corporationनगर पालिका