शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: आर. आर. पाटलांवर गंभीर आरोप; वाद चिघळल्यानंतर अजित पवार म्हणाले...
2
"दाऊदशी संबंध जोडणाऱ्यांना नोटिस बजावणार’’, भाजपा नेत्यांना नवाब मलिकांचा इशारा 
3
अमित ठाकरेंना घेरण्याची 'उद्धव'निती; थेट मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना लिहिलं पत्र
4
'शरद पवार कुटुंब फुटू देणार नाहीत', छगन भुजबळांचं विधान
5
पडद्यामागून भाजपाची वेगळीच 'रणनीती'?; मागील निवडणुकीपेक्षा जास्त उमेदवार रिंगणात
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : ढसा ढसा रडले, १०० तासानंतर घरी परतले, कुठे गेले, कोणाला भेटले, श्रीनिवास वनगांनी काय सांगितलं?
7
एकेकाळी घराघरात कलर टीव्ही पोहोचविणाऱ्या BPL कंपनीच्या संस्थापकांचे निधन; टीपी गोपालन नांबियार काळाच्या पडद्याआड
8
'तेव्हा' आदित्यसाठी राज ठाकरेंना पाठिंबा मागितला नव्हता; महेश सावंत यांचा खोचक टोला
9
IND vs NZ : रोहित-विराट यांना काही वेळ द्या, ते मेहनत घेत आहेत - अभिषेक नायर
10
महाराष्ट्रात फक्त 'इतक्या' जागांवर AIMIM चे उमेदवार; काय आहे ओवेसींची रणनिती? पाहा...
11
काँग्रेसला आणखी धक्के बसणार? देवेंद्र फडणवीसांनी सगळेच सांगितले; म्हणाले, “आताच नावे...”
12
"वर्षा गायकवाड आणि त्यांच्या पतीने काँग्रेस विकली"; रवी राजांनंतर आणखी एका नेत्याचा गंभीर आरोप
13
बापरे! तरुणाने मोबाईल खिशात ठेवला अन् भयंकर स्फोट झाला, गंभीररित्या भाजला
14
IND vs NZ : भारताच्या पराभवानंतर अखेर गौतम गंभीरनं सोडलं मौन; टीम इंडियाच्या 'हेड'ची रोखठोक मतं
15
"धर्म की पुनर्रस्थापना हो...!"; दिवाळी निमित्त पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानातील हिंदूंना उद्देशून काय म्हणाले पवन कल्याण
16
समीकरण जुळले, आता ३ तारखेला जागा अन् उमेदवार ठरणार; मनोज जरांगेंची मोठी घोषणा
17
भारताचे 'जेम्स बाँड' अजित डोवाल यांची अमेरिकेशी महत्त्वाची चर्चा, देशाच्या सुरक्षेसंबंधी बोलणी
18
पीएम मोदींनी कच्छमध्ये जवानांसोबत साजरी केली दिवाळी, स्वतःच्या हाताने मिठाई खाऊ घातली
19
प्रचाराला जाताना ठाकरे गटाच्या उमेदवाराला आला हार्ट अटॅक; तातडीनं रुग्णालयात दाखल
20
जबरदस्त तिमाही निकालानंतर 'हा' शेअर सुस्साट; घसरत्या बाजारातही जोरदार तेजी

लस न देताच प्रमाणपत्र वाटप प्रकरणात महापालिकेच्या पथकाकडून दहाजणांची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2021 2:20 PM

या प्रकरणात महापालिकेने नियुक्त केलेल्या चौकशी समितीने सोमवारी दहा कर्मचाऱ्यांची चौकशी केली.

औरंगाबाद : कोरोना प्रतिबंध लस न घेताच तब्बल १६ नागरिकांना प्रमाणपत्र वाटप झाल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी डीकेएमएम महाविद्यालयातील केंद्रावर घडला. या प्रकरणात महापालिकेने नियुक्त केलेल्या चौकशी समितीने सोमवारी दहा कर्मचाऱ्यांची चौकशी केली. पोलिसांनी या प्रकरणी अद्याप ठोस पाऊल उचलले नाही. पाेलिसांच्या कारवाईकडे मनपाचे लक्ष लागले आहे.

डीकेएमएम महाविद्यालयातील महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर शनिवारी ५५ नागरिकांनी रांगेत येऊन लस घेतली. दुपारी एक वाजता या केंद्राच्या सर्व्हरवर ७१ नागरिकांनी लस घेतल्याची नोंद झाली. अचानक १६ नागरिक वाढले कोठून असा प्रश्न संगणक ऑपरेटरला पडला. त्याने त्वरित वरिष्ठांना ही बाब कळविली. त्यानंतर मनपाने लगेच हे लसीकरण केंद्र तूर्तास बंद केले. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी तीनजणांची समिती स्थापन केली. त्यात डॉ. मेघा जोगदंड, डॉ. मनीषा भोंडवे तांत्रिक कर्मचारी हेमंत राठोड यांचा समावेश आहे. डॉ. मंडलेचा यांनीदेखील लसीकरण केंद्रावर जाऊन तेथील कर्मचाऱ्यांची चौकशी केली.

चौकशी समितीमधील सदस्यांनी त्या लसीकरण केंद्रावरील दहा कर्मचाऱ्यांची चौकशी केली. यासंदर्भात कर्मचाऱ्यांनी सांगितले की, त्यांचे जबाब नोंदविले असून, दोषी कोण या निष्कर्षाप्रत आम्ही आलो नाही. बेगमपुरा पोलिसांकडे तक्रार नोंदविली आहे. पोलिसांच्या सायबर सेलची मदत घ्यावी लागणार आहे. सायबर सेलमधील अधिकारी चौकशीसाठी नियुक्त केले जातील. त्यातून अजून काही बाबी स्पष्ट होतील. डीकेएमएम केंद्रावरचा घडलेला प्रकार हा पहिलाच प्रकार आहे. या प्रकारामुळे आम्हीदेखील सतर्क झालो आहोत.

हेही वाचा - लस न घेताच १६ जणांना प्रमाणपत्र; महापालिकेच्या कोरोना लसीकरणात महाघोटाळा

जिन्सी, आरेफ कॉलनीची चौकशी नाहीशासकीय कार्यालये, खासगी कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांना लस सक्तीची केली आहे. त्यामुळे मागील काही दिवसांमध्ये जिन्सी, आरेफ कॉलनी केंद्रावर अशा पद्धतीने अनेक नागरिकांना लस दिल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. या दोन्ही केंद्रांची मनपाने अद्याप चौकशी सुरू केलेली नाही, हे विशेष.

युजर नेम, पासवर्ड हॅक केला असेलडीकेएमएम महाविद्यालयातील केंद्रात कोविन ॲपद्वारे लसीकरण सुरू होते. हे काम सुरू असताना हॅकरने सोयीनुसार युजर आणि पासवर्ड चोरला असेल. ॲपमध्ये व्हायरस आल्यानंतरही ते हॅक करणे सोपे असते. हॅकरने संपूर्ण शहरातील वेबसाईट हॅक न करता एकाच केंद्राला लक्ष्य केले असण्याची शक्यता आहे.- श्रेयस मोदी, सायबर तज्ज्ञ.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका