औरंगाबाद : औरंगाबाद : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यासाठी शनिवारी सायंकाळी क्रांतीचौकात जमलेल्या आंबेडकरी अनुयायांचे ‘भीम’दर्शन सर्वांना घडले. मुख्य मिरवणुकीसाठी चोहोबाजूने भीमसागर उसळला होता. भीम जयंती मिरवणुकीत किरकोळ काराणातुन एका तरूणाची दोन भावानी भोसकून हत्या केल्याची घटना औरंगाबाद येथे घडली आहे.
काल रात्री दोन वाजण्याच्या सुमारास हत्या करण्यात आल्या चे वृत्त आहे. भीम जयंती मिरवणुकीवेळी दोघांमध्ये किरकोळ कारणावरुन तू-तू मैं-मैं झाले होते. त्याचा राग मनात धरुन दोन भावडांनी मिळून तरुणाची भोसकून हत्या केली. आशिष संजय साळवे (वय २७ . ऱा रमानगर ) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर, अविनाश गौतम जाधव आणि कुणाल गौतम जाधव अशी संशयीत आरोपींची नावे आहेत. सद्या आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. संतप्त जमावाने आरोपीच्या घरावर दगडफेक केली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बॅनरची विटंबना केल्याचा निषेधार्थ नांदेडात रास्ता रोको
नांदेड - डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बॅनरची विटंबना केल्याच्या निषेधार्थ नांदेड शहरानजीक असलेल्या विष्णुपुरी येथे रस्ता रोखण्यात आला आहे. एका ठिकाणी बसवर दगडफेक करण्यात आली आहे. त्यामुळे लातूर नांदेड रस्त्यावर वाहनांची मोठी रीघ लागली आहे. विष्णुपुरी परिसरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देण्यासाठी लावलेल्या बॅनरवरील फोटोची अज्ञात व्यक्तीनी विटंबना केली. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी रास्ता रोको करीत या घटनेचा निषेध केला तसेच विटंबना करणाऱ्या समाजकंठकाना अटक करण्याची मागणी केली आहे. घटनास्थळी पोलीस दल दाखल झाले आहे.