शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
6
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
7
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
8
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
9
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
10
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
11
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
12
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
13
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
14
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
15
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
16
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
17
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
18
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
19
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
20
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव

विजयानंतर रात्री मुस्लिम, दलित वसाहतींमध्ये जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 12:40 AM

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात १९८० मध्ये काँग्रेसचे काझी सलीम निवडून आले होते. त्यानंतर मागील ३९ वर्षांमध्ये एकदाही मुस्लिम उमेदवार निवडून आला नाही. त्यामुळे गुरुवारी रात्री एमआयएम-बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार इम्तियाज जलील निवडून येताच मुस्लिम बांधवांनी चक्क रमजान ईदच साजरी केली.

ठळक मुद्दे३९ वर्षांचा वनवास संपला : १९८० नंतर प्रथमच मुस्लिम खासदार

औरंगाबाद : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात १९८० मध्ये काँग्रेसचे काझी सलीम निवडून आले होते. त्यानंतर मागील ३९ वर्षांमध्ये एकदाही मुस्लिम उमेदवार निवडून आला नाही. त्यामुळे गुरुवारी रात्री एमआयएम-बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार इम्तियाज जलील निवडून येताच मुस्लिम बांधवांनी चक्क रमजान ईदच साजरी केली. या आनंदोत्सवाला दलित बांधवांनीही तेवढ्याच तोलामोलाची साथ दिली. रात्री ‘तरावीह’च्या नमाजनंतर मिरवणुका, फटाक्यांची आतषबाजी करीत जिकडे तिकडे एकच जल्लोष साजरा करण्यात येत होता.२३ एप्रिल रोजी औरंगाबाद लोकसभेसाठी मतदान घेण्यात आले होते. मागील एक महिन्यापासून बहुजन वंचित आघाडी, एमआयएम कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिक २३ मेच्या निकालाची चातकाप्रमाणे आतुरनेने वाट पाहत होते. अखेर गुरुवारी तो दिवस उगवला. सकाळी फजरच्या नमाजनंतर हजारो कार्यकर्ते मेल्ट्रॉन कंपनीसमोर ठाण मांडून बसले होते. याच ठिकाणी दिवसभर त्यांनी जोहर, असर आणि मगरीबची नमाज अदा केली. तत्पूर्वी इफ्तारही येथेच केला. रात्री इम्तियाज जलील यांच्या निवडीची घोषणा होताच सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले होते. अनेक उत्साही कार्यकर्त्यांनी इफ्तारपूर्वी आणि नंतरच फटाक्यांची आतषबाजी केली. सध्या रमजान महिना सुरू आहे. रात्री उशिरा ‘तरावीह’ची नमाज झाल्यानंतर मिलकॉर्नर, बुढीलेन, टाऊन हॉल, घाटी, लोटाकारंजा, शहाबाजार, रोशनगेट, जिन्सी, किराडपुरा, सिद्धार्थनगर, टी. व्ही. सेंटर आदी भागांत जल्लोष साजरा करण्यात येत होता. हिरव्या, निळ्या गुलालाची मुक्तपणे उधळण सुरू होती. कार्यकर्ते, सर्वसामान्य नागरिक आणि विशेषत: तरुणाईला हा विजय गगनात मावेनासा झाला होता. कौन आया कौन आया...शेर आया शेर आया... ही लोकप्रिय घोषणाही यावेळी देण्यात येत होती.डीजे लावून आनंदोत्सवडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भडकलगेट येथील पुतळ्यासमोर डीजे लावूनही कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. रात्री उशिरापर्यंत मुस्लिमबहुल भागातील सर्वच रस्ते गर्दीने तुडुंब भरले होते. जिकडे तिकडे हिरव्या गुलालाची उधळण सुरू होती.------------

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliticsराजकारणLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकाल