शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’; औरंगाबादेत आजपासून प्रत्येक घरात जाऊन आरोग्य तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 2:03 PM

जिल्ह्यातील ९ लाख कुटुंबांची होणार पाहणी

ठळक मुद्दे मुख्यमंत्र्यांनी घेतला तयारीचा आढावामहापालिकेची ३४५ पथके तयार 

औरंगाबाद : ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या उपक्रमांतर्गत मंगळवारपासून शहरातील प्रत्येक घरी जाऊन महापालिकेचे कर्मचारी नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करणार आहेत. कोविडची  कोणतीही लक्षणे दिसल्यास संबंधिताला त्वरित उपचार देण्यात येणार आहेत. या कामासाठी महापालिकेने ३४५ पथके नेमली आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी सायंकाळी या मोहिमेचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंंगद्वारे प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेतला. 

मोहीम कालावधीत गृहभेटी देण्यासाठी आरोग्य पथके तयार करणे, ताप, खोकला, दम लागणे अशी कोविडसदृश लक्षणे असणाऱ्या व्यक्तींना जवळच्या फीवर क्लिनिकमध्ये पाठविणे, घरातील सर्व सदस्यांना  प्री कोविड, कोविड आणि पोस्ट कोविड परिस्थितीनुसार आरोग्य संदेश समजावून सांगणे यासारख्या गाईडलाईन्स शासनाने मोहिमेदरम्यान राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

जिल्ह्यातील ९ लाख कुटुंबांची होणार पाहणीकोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळावे, यासाठी विविध माध्यमांतून प्रयत्न सुरू आहेत. त्याअनुषंगानेच ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम राबविण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील ९ लाख कुटुंबांची पाहणी यात करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली. १५ सप्टेंबरपासून ही मोहीम सुरू होणार असून, यामध्ये घरोघरी जाऊन आरोग्याबाबतीत पाहणी केली जाईल.  पाहणीत दोन कर्मचाऱ्यांचे व स्वयंसेवकांचे एक पथक असेल. हे पथक एका दिवसात ५०  घरांना भेटी देईल. त्यामध्ये घरातील लोकांना काय आजार आहेत, याची माहिती गोळा केली जाणार आहे. कुटुंबांतील सदस्याला ताप तसेच छातीचे काही आजार आहेत का याची माहिती संकलित केली जाणार आहे. १५ सप्टेंबर ते १० आॅक्टोबरदरम्यान पहिला तर १२ ते २४ आॅक्टोबर काळात दुसऱ्या टप्प्यातील मोहीम राबविण्यात येईल.

होम आयसोलेशनबाबत अहवालाची मागणी कोरोनाची रुग्णसंख्या पाहता होम आयसोलेशनच्या सूचना मुख्य सचिवांनी दिल्या होत्या. त्यानंतर जिल्हाधिकारी चव्हाण यांनी अधिष्ठाता, मनपा आरोग्य अधिकाऱ्यांना याबाबतच्या धोरणासंदर्भात दोन दिवसांत अहवाल देण्याची सूचना दिली आहे. सध्या २५ हॉस्पिटल्सच्या माध्यमातून होम आयसोलेशनमध्ये उपचार केले जातात. १ हजार ७० रुग्णांवर सध्या उपचार करण्यात येत आहेत. अहवाल आल्यानंतर बैठक होईल, त्यानंतर पुढील निर्णय होईल. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद