शहरं
Join us  
Trending Stories
1
जरी मला मुख्यमंत्री केले तरी मी होणार नाही; 'महाराष्ट्राचा सीएम कोण'वर असे का बोलले नितीन गडकरी?
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'१५०० दिलेत, महायुतीला मत दिले नाही तर ३००० वसुल करणार'; भाजपा महिला नेत्याचं वादग्रस्त विधान
3
“लाखो रोजगार गुजरातला, राज्याचे किती कोटींचे प्रकल्पही गेले?”; राहुल गांधींनी आकडाच सांगितला
4
'PM मोदींनी कधीच संविधान वाचले नाही, त्यामुळे त्यांना ते कळणार नाही,' राहुल गांधींचे टीकास्त्र
5
शरद पवारांनी गद्दार म्हणत पाडण्याचं आवाहन केलं; दिलीप वळसे पाटलांची पहिली प्रतिक्रिया 
6
Swiggy Share Price : सलग दुसऱ्या दिवशीच्या तेजीनंतर Swiggy चा शेअर आपटला, कंपनीला ३ ते ५ वर्षांत उत्तम वाढीची अपेक्षा
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'लोकसभेला विशाल पाटील यांना मदत झाली, शिवसेनावाले क्षमा करा', भरसभेत बाळासाहेब थोरातांची कबुली
8
"बटेंगे तो पॉकेट कटेंगे और भाजपावाले हटेंगे तो दाम घटेंगे", महागाईवरून काँग्रेसचा टोला
9
"रोनाल्डो आणि मेस्सीसोबत लव्ह ट्रँगलमध्ये राहायचंय", हे काय बोलून गेली उर्वशी रौतेला?
10
Gold Silver Rate Today : लग्नसराईच्या हंगामात सोन्या-चांदीचे दर घसरले; ₹५००० पर्यंत कमी झाला सोन्याचा भाव
11
IND vs SA : फलंदाज अन् गोलंदाज दोघेही तेच; फिल्डर बदलला पण रिझल्ट तोच! (VIDEO)
12
सर्वोच्च न्यायालयाबाहेर एका व्यक्तीने स्वतःला बॉम्बने उडवले, परिसरात एकच खळबळ
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महायुतीमध्ये पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? विनोद तावडेंनी थेटच सांगितलं
14
कोरोना काळात केलेली व्हॅक्सीनची मदत; 'हा' देश PM मोदींचा सर्वोच्च पुरस्काराने करणार सन्मान
15
बटेंगे तो कटेंगेचा नारा देणाऱ्यांकडून त्यांचाच प्रदेश सांभाळला जात नाही; चंद्रशेखर आझादांचे टीकास्त्र
16
त्रिपुरारी पौर्णिमा: ५ राशींवर हरिहर कृपा, धनलक्ष्मीचे शुभाशिर्वाद; पद-पैसा-समृद्धी वाढ!
17
'बटेंगे तो कटेंगे', 'एक है तो सेफ है' या योगी-मोदींच्या घोषणेवर नवाब मलिकांचा प्रहार
18
Jio Financial च्या शेअरमध्ये जोरदार तेजी, 'या' कारणामुळे आली ६ टक्क्यांपेक्षा अधिक तेजी 
19
कांद्याचे दर कमी होणार की नाही? जाणून घ्या, भाजीपाल्यांच्या किमतीचा ताजा रिपोर्ट
20
'टीम ट्रम्प'मध्ये ४ वंडर वुमेनवर मोठी जबाबदारी; कुणी चीफ ऑफ स्टाफ, तर कुणी इंटिलिजेंस...

"शिवसेनेशी माझे संबंध संपले"; हर्षवर्धन जाधव यांचा पक्षाला जय महाराष्ट्र 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 12:23 PM

शिवसेनेचे कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्याचे मंगळवारी जाहीर केले. 

ठळक मुद्देमहाराष्ट्रात आतापर्यंतच्या राजकारणामुळे सामाजिक विषमता तयार झाली आहे.नवीन पक्ष स्थापन करण्याची घोषणा करून महिनाभरात पक्ष नोंदणी होईल

औरंगाबाद : मी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे दिला आहे. काही दिवसांत नवीन पक्ष काढतोय, त्यामुळे आता माझा शिवसेनेशी काहीही संबंध राहिलेला नाही. पक्ष माझ्यावर कारवाई करणार किंवा काय निर्णय घेणार, हा प्रश्नच नाही, असे सांगून शिवसेनेचे कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्याचे मंगळवारी जाहीर केले. 

महाराष्ट्रात आतापर्यंतच्या राजकारणामुळे सामाजिक विषमता तयार झाली आहे. ती विषमता मिटविण्यासाठी नवीन राजकीय पक्ष स्थापन करावा काय, याचे चिंतन करण्यासाठी मी तापडिया नाट्य मंदिरात चिंतन बैठक बोलावली होती. बैठकीत अठरा पगड जातींच्या प्रतिनिधींनी मते मांडली. त्यानंतर नवीन पक्ष स्थापन करण्याची घोषणा करून महिनाभरात पक्ष नोंदणी होईल, दोन ते चार दिवसांत पक्षाचे नाव जाहीर करणार असल्याचे जाधव यांनी सांगितले. 

आ. जाधव म्हणाले, न्हावी, माळी, कोळी, धनगर, दलित, राजपूत, ठाकूर, वंजारी, मुस्लिम या प्रत्येक समाजाला त्रास होतो आहे. उत्तम पर्याय म्हणून नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याचे सर्वांनी सुचविले आहे. मराठा समाजासाठी पक्ष स्थापन करण्याबाबत मी बोललो होतो; परंतु कालांतराने मला समजले की, मराठा समाज आणि इतर समाजांचे देखील सारखेच प्रश्न आहेत. मला सर्वंकष जाणीव झाली की, राज्य सरकारने सर्व समाजांसमोर प्रश्न निर्माण करून ठेवले आहेत. त्यामुळे सर्वांना सोबत घेऊन पक्ष काढण्याचे ठरविले. धुळे, नंदुरबार येथील जि.प. निवडणूक पक्ष लढणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

मराठा आरक्षणाबाबत न बोलण्याच्या सूचनाशिवसेनेचे आमदार असल्यामुळे पक्षाकडून दबाव येऊ शकतो, यावर आ. जाधव म्हणाले, शिवसेनेने जी काही धोरणे घेतली आहेत, ती पटलेली नाहीत. मराठा आरक्षणावर बोलायचे नाही, अशी सूचना करण्यात आली. ते मला थोडेसे पचले नाही. इतर काही धोरणे आहेत तीदेखील पटलेली नाहीत. त्यामुळे त्यांच्याबरोबर आता थांबायचे नाही, असे ठरविले. 

बॅकफूटवर जाणार नाहीमाझ्या वतीने शिवसेनेशी काही संबंध राहिलेला नसल्यामुळे मी बॅकफूटवर जाणार नाही. माझे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत व्यक्तिगत चांगले संबंध आहेत, ते आगामी काळातही राहतील. सरकारने मराठा आरक्षण दिले तरी मी राजीनामा परत घेणार नाही, धनगर आणि मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे हीदेखील माझी मागणी आहे. 

बायको म्हणाली रिकामा धंदा...बायकोची (संजना जाधव) व्यथा समजत आहे. सासरे भाजपचे नेते आहेत. बायको सांगून थकली की, पक्ष काढण्याचा रिकामा धंदा करू नका. शेवटी वैतागून म्हणाली, ठीक आहे. जसे करायचे तसे करा. मी प्लास्टिकचा बॉल आहे. कुठेही बुडवा वर येणारच, त्यामुळे मला बुडविण्याचा कुणीही प्रयत्न करू नये. शिवसेनाप्रमुखांना ४० वर्षे लागले पक्षाचा मुख्यमंत्री बनविण्यासाठी. त्यांचं जमलं, आज ना उद्या आपलंही जमेल. पक्षाला पैसे नव्हे तर माणसे लागतात. हिंदुत्व खतरे में म्हणून ‘गध्याला’ मतदान करा हे कुणी सांगितले. मुस्लिमांची भीती दाखविण्याचे किडे डोक्यात कुणी घातले, असा सवालही आ. जाधव यांनी यावेळी केला. 

टॅग्स :Harshavardhan Jadhavहर्षवर्धन जाधवPoliticsराजकारणShiv Senaशिवसेना