शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

३, ७ अन १६ मतांनी गमवल्या ३ जागा; शिवसेनेची अटीतटीच्या लढतीत भाजपवर सरशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2022 7:05 PM

Nagar Panchayat Election Result 2022: एकूण २९ मते कमी पडली आणि भाजपने गमाविल्या तीन जागा

सोयगाव : नगरपंचायतीच्या निवडणुकीत (Nagar Panchayat Election Result 2022) अवघ्या २९ मतांनी भाजपकडून ( BJP ) तीन जागा गमावल्या असून, काही मतांच्या फरकाने शिवसेनेने ( Shiv Sena ) विजय मिळवून भाजपला पराभवाचे खडे चारले आहेत. त्यामुळेच शिवसेनेला बहुमताचा आकडा पार करता आला आहे.

नगरपंचायत निवडणुकीत दुसऱ्या टप्प्यात झालेल्या वार्ड क्रमांक दोनमध्ये भाजपचे प्रमोद पाटील यांना १९३, तर शिवसेनेचे अक्षय काळे यांना १९९ मते पडल्याने काळे अवघ्या तीन मतांनी विजयी झाले. वार्ड क्रमांक सहामध्ये भाजपच्या संगीता मनगटे यांचाही अवघ्या सात मतांनी पराभव झाला असून, येथे शिवसेनेच्या संध्या मापारी यांनी विजयश्री खेचून आणली. प्रभाग क्रमांक नऊ मध्ये शिवसेनेच्या सुरेखाबाई काळे यांचा १६ मतांनी विजय झालेला असून, भाजपचे विनोद मिसाळ यांना १२४ मते पडली. या तीनही प्रभागांत भाजपला २९ मतांनी तिन्ही जागा गमवाव्या लागल्या, तर प्रभाग क्रमांक १५ मध्ये झालेल्या काट्याच्या लढतीत शिवसेनेच्या परवीन बानो शहा यांचा केवळ तीन मतांनी पराभव झाला. भाजपच्या सुलताना देशमुख यांना २०३ मते पडली. सतरा उमेदवारांमध्ये सर्वाधिक मते मिळवून शिवसेनेच्या शाहिस्ताबी रऊफ (२९७), कुसूम राजू दुतोंडे (२१०) आणि भाजपच्या सुलतानाबी रऊफ (२०३) यांनी विजय मिळविला आहे.

नगरपंचायत सभागृहात दहा महिला ---नगरपंचायत सभागृहात शिवसेनेच्या पाच, तर भाजपच्या पाच अशा दहा महिला शहराचे प्रतिनिधित्व करणार असून, भाजप विजयी सहा उमेदवारांमध्ये पाच महिला उमेदवारच आहेत. त्यामुळे नगरपंचायतीचे सभागृहात केवळ सात पुरुष असणार आहे.

काँग्रेसला केवळ १९३ मते दोन्ही टप्प्यांत झालेल्या १७ प्रभागासाठीच्या निवडणुकीत शहरातील पाच हजार २०६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये शिवसेनेच्या पारड्यात २ हजार ६२३, तर भाजपला २ हजार ६३ मतदान झाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या खात्यात मात्र शहरातील ४२३ मतदारांनी कौल दिला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पारड्यात २३०, तर काँग्रेसला १९३ मते मिळाली आहेत.

टॅग्स :Nagar Panchayat Election Result 2022नगर पंचायत निवडणूक निकाल २०२२AurangabadऔरंगाबादShiv SenaशिवसेनाBJPभाजपाAbdul Sattarअब्दुल सत्तार