शहरं
Join us  
Trending Stories
1
आजवर गावे बहिष्कार टाकत होती, आता शहरानेच मतदानावर बहिष्कार टाकला; का? 
2
'या' विधानसभा मतदारसंघावरून भाजपमध्येच मोठं घमासान, मुनगंटीवार थेट दिल्ली गाठणार
3
विधानसभेसाठी भाजपाकडून उमेदवारांची निर्यात, हे पाच नेते महायुतीतील मित्रपक्षांकडून लढणार
4
दलित वसाहतीला आग लावणाऱ्या 101 जणांना न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा...
5
एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अदानी-अंबानींच्या कंपन्यांनाही टाकलंय मागे
6
"लॉरेंस बिश्नोई खरा गांधीवादी, तो तर...", सलमान खानचा उल्लेख करत काय म्हणाल्या साध्वी प्राची?
7
इस्रायलच्या 'या' एका चुकीवर इराण 1000 क्षेपणास्त्र डागणार, 'खतरनाक' प्लॅन उघड
8
Pratap Patil Chikhalikar: २० वर्षात चिखलीकरांनी पाचव्यांदा बदलला पक्ष, असा आहे इतिहास
9
Gold Silver Rates : धनत्रयोदशीपूर्वी स्वस्त झालं सोनं; एका वर्षात ३० टक्क्यांनी वाढलाय भाव
10
"माझी लढाई त्यापेक्षा मोठी...", आदित्य ठाकरेंसोबतच्या तुलनेवर अमित ठाकरे थेट बोलले!
11
Diwali: दिवाळीनिमित्त घराला रंग देताय? येणारे-जाणारे, पै-पाहुणे पाहतच राहतील असे कलर कॉम्बिनेशन...
12
Diwali 2024: दिवाळीत चुकूनही भेट म्हणून देऊ नका 'या' सहा वस्तू; नात्यात येईल वितुष्ट!
13
अरे देवा! मजुरी करून बायकोला शिकवलं, नोकरी लागल्यावर तिने नवऱ्यालाच सोडलं, म्हणाली...
14
Diwali 2024: आंघोळ आपण रोजच करतो, तरी दिवाळीत अभ्यंगस्नानाला एवढे महत्त्व का? वाचा!
15
“वरळी विकासापासून वंचित, आदित्य ठाकरेंचा परतीचा प्रवास सुरु”; शिंदे गटाची खरमरीत टीका
16
इच्छुकांसोबत चर्चेदरम्यान मनोज जरांगेंच्या डोळ्यात तरळले अश्रू; २५ तास चालल्या मुलाखती
17
Stock Market Today : शेअर बाजार जोरदार आपटला, Sensex ८० हजारांच्या खाली; गुंतवणूकदारांचे ८ लाख कोटी बुडाले, कारण काय?
18
अजित पवारांच्या आमदाराची मोठी घोषणा; तिसऱ्या आघाडीत प्रवेश, तिकीटही मिळाले
19
"मान ताठ करुन फिरेल असा..."; युगेंद्र पवारांच्या आव्हानावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
20
वरळीत तिरंगी सामना रंगणार, शिंदेगट आदित्य ठाकरेंविरोधात मिलिंद देवरांना उतरवणार?

‘आयी आयी चेन्नई एक्स्प्रेस आयी’; दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा धावणार 'चेन्नई-नगरसोल' रेल्वे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 6:49 PM

अखेर दक्षिण मध्य रेल्वेने ही एक्स्प्रेस प्रवाशांच्या सेवेत पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला.

औरंगाबाद : चेन्नई एक्स्प्रेस चित्रपटातील ‘टिकट खरीद के, बैठा जा सीट पे, निकल ना जाए कहीं चेन्नई एक्सप्रेस, चेन्नई आयी आयी आयी आयी चेन्नई एक्सप्रेस...’ हे गीत रेल्वे प्रवाशांना खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा म्हणता येणार आहे. कोरोना विळख्यात गेल्या २ वर्षांपासून बंद असलेली नगरसोल-चेन्नई-नगरसोल साप्ताहिक एक्स्प्रेस २६ जूनपासून पुन्हा एकदा धावणार आहे.

दोन वर्षांपासून ही एक्स्प्रेस सुरू होण्याची प्रतीक्षा होती. अखेर दक्षिण मध्य रेल्वेने ही एक्स्प्रेस प्रवाशांच्या सेवेत पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. या रेल्वेला द्वितीय श्रेणी वातानुकूलित, तृतीय श्रेणी वातानुकूलित, स्लीपर क्लास आणि जनरल अशा एकूण २३ बोगी राहणार आहेत. गेल्या दोन वर्षांपासून शहराची रेल्वेची चेन्नईची कनेक्टिव्हिटी तुटली होती. परंतु, ही कनेक्टिव्हिटी पुन्हा मिळणार आहे.

असे आहे रेल्वेचे वेळापत्रकचेन्नई सेंट्रल ते नगरसोल ही रेल्वे २६ जूनपासून दर रविवारी सकाळी ९.१० वाजता चेन्नई सेंट्रल रेल्वे स्टेशनवरून सुटेल. रेणीगुंठा, कर्नूल, काचीगुडा, निजामाबाद, नांदेडमार्गे ही रेल्वे औरंगाबादेत दुसऱ्या दिवशी, सोमवारी सकाळी ९.५५ वाजता दाखल होईल आणि १० वाजता पुढे रवाना होईल. दुपारी ११.५५ वाजता नगरसोल येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात नगरसोल ते चेन्नई सेंट्रल एक्स्प्रेस २७ जूनपासून दर सोमवारी दुपारी १.३० वाजता नगरसोल रेल्वे स्टेशनवरून सुटेल आणि औरंगाबादला दुपारी २.४५ वाजता पोहोचेल. ५ मिनिटांच्या थांब्यानंतर ही रेल्वे पुढे रवाना होईल. नांदेड, निजामाबाद, काचीगुडा, कर्नुल, रेणीगुंठामार्गे चेन्नई सेंट्रल रेल्वे स्टेशनवर मंगळवारी दुपारी ३.३० वाजता ही रेल्वे पोहोचेल.

टॅग्स :railwayरेल्वेAurangabadऔरंगाबादtourismपर्यटन