शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

निकृष्ट शौचालय साहित्यावरून शिवसैनिकांचा संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 12:52 AM

परभणी : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पंचायत समितीच्या माध्यमातून लाभार्थ्यांना देण्यात आलेले शौचालयाचे साहित्य निकृष्ट असल्याच्या व लाभार्थ्यांना अनुदान मिळत नसल्याच्या कारणावरून शिवसैनिकांनी बुधवारी जि़प़ मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील खोडवेकर यांच्या कक्षात चांगलाच गदारोळ केला व त्यांच्या टेबलवरच हे साहित्य आणून मांडल्याने प्रशासनाची एकच धावपळ उडाली़

ठळक मुद्देशौचालयाचे साहित्य निकृष्ट असल्याच्या व लाभार्थ्यांना अनुदान मिळत नाही७ हजार रुपयांचे अनुदान मिळालेच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पंचायत समितीच्या माध्यमातून लाभार्थ्यांना देण्यात आलेले शौचालयाचे साहित्य निकृष्ट असल्याच्या व लाभार्थ्यांना अनुदान मिळत नसल्याच्या कारणावरून शिवसैनिकांनी बुधवारी जि़प़ मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील खोडवेकर यांच्या कक्षात चांगलाच गदारोळ केला व त्यांच्या टेबलवरच हे साहित्य आणून मांडल्याने प्रशासनाची एकच धावपळ उडाली़स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्हा परिषदेच्या वतीने लाभार्थ्यांना देण्यात येणाºया शौचालय उभारणीच्या साहित्याचा मुद्दा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेचा बनला आहे़ या अनुषंगाने बुधवारी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, जि़प़तील गटनेते राम खराबे, जि़प़ सदस्य राजू चापके, माणिकराव घुमरे, प्रभाकर वाघीकर, प्रभाकर जैस्वाल आदींसह शिवसैनिक दुपारी २ च्या सुमारास मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील खोडवेकर यांच्या कक्षात दाखल झाले़ सोबत त्यांनी शौचालय उभारणीचे आणलेले साहित्य खोडवेकर यांच्या टेबलवर ठेवले व हे साहित्य निकृष्ट दर्जाचे असून, लाभार्थ्यांच्या माथी का मारले जात आहे? असा जाब विचारला, तसेच जिल्ह्यातील ६ हजार ४५५ लाभार्थ्यांना ५ हजार रुपये प्रमाणे जि़प़ने अनुदान दिले़ त्यानुसार त्यांनी वैयक्तीक शौचालय उभारले़ परंतु, या लाभार्थ्यांना पुढील ७ हजार रुपयांचे अनुदान मिळालेच नाही, हे अनुदान का दिले जात नाही, असा जाब विचारला़ यावेळी बराच गदारोळही झाला़ उपस्थित काही लाभार्थ्यांनी शौचालय उभारण्यााठी आलेल्या अडचणी कथन केल्या़ येत्या पाच दिवसांत हे अनुदान न दिल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला़ यावेळी गुणाजी आवकाळे, नितीन देशमुख, अशोक देशमुख, गोविंद गोसावी, कृष्णा रणेर, सुभाष माने, पांडूरंग रणेर, बाबा सामाले, महेश देशमुख, प्रशांत सुदेवाड आदींची उपस्थिती होती़