शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

भिशी, आरडीच्या नावाखाली भोकरकरांना कोट्यवधींचा गंडा

By admin | Published: June 30, 2017 12:07 AM

भोकर : भिशीद व आरडीच्या नावाखाली कोट्यवधी रुपये जमा करून दाम्पत्याने पलायन केल्याचा धक्कादायक प्रकार भोकरमध्ये बुधवारी उघडकीस आला.

राजेश वाघमारे । लोकमत न्यूज नेटवर्क भोकर : भिशीद व आरडीच्या नावाखाली कोट्यवधी रुपये जमा करून दाम्पत्याने पलायन केल्याचा धक्कादायक प्रकार भोकरमध्ये बुधवारी उघडकीस आला. पोलिसांनी या प्रकरणी दाम्पत्याविरूद्ध गुरुवारी गुन्हा नोंदविला़ फसवाफसवीच्या या प्रकरणात गोरगरीब मजूरदार, व्यापारी, नोकरदार अडकले आहेत़ विशाल विजयकुमार कुंडगुलवार व त्याची पत्नी श्रृतिका (रा़दिवशी खुर्द, ह़ मु़ अमिननगर भोकर) यांच्या मालकीचे विशाल इंटरप्राईझेस नावाचे दुकान आहे़ काही दिवसापूर्वी या दाम्पत्याने अंजनाबाई देवराव सूर्यवंशी या महिलेला आम्ही भीसी व आऱडी़ उघडली आहे़ यात सुरुवातीला १० हजार रुपये, त्यापुढे प्रत्येक महिन्यात एक ते दोन हजाराच्या फरकेने रक्कम जमा केल्यास वर्षानंतर एक लाखाच्या रकमेवर १ लाख १९ हजार रुपये मिळतील, असे आमिष दाखवून तिचा विश्वास संपादन केला. यानंतर शहरातील मजूरदार, व्यापारी, शिक्षक, कर्मचाऱ्यांनाही असेच आमीष दाखवून या सर्वांना या जाळ्यात ओढले. दरम्यान, अंजनाबाईने या दाम्पत्याकडे चार भीसी व एक आरडी काढली़ यातून तिचे ३ लाख ३१ हजार ७०० रुपये जमा झाले होते़ जमा रक्कम मिळण्यासाठी ती कुंडगुलवार दाम्पत्याकडे गेली़ तिने पैशाची मागणी केली़ पाठपुरावा केला़ या दरम्यान आठ दिवसापूर्वी कुंडगुलवार दाम्पत्य पसार झाल्याचे लक्षात आले़ यात अल्ताफ भोजानी १३ लाख, संतोष एच़ मामीडवार ४ लाख ९३ हजार, दिगंबर घोडके ५२ हजार, राम पिंगलवाड ७६ हजार, संदिप श्रीमलवार ५० हजार, लक्ष्मीबाई मस्के ३५ हजार, सविता कदम ६२ हजार, कमलबाई माधव रेड्डी १ लाख ५० हजार यांच्यासह ६१ जणांना एकूण ३९ लाख ४१ हजाराचा फटका बसला़ अफरातफरीची ही रक्कम कोट्यवधीच्या घरात जाण्याची शक्यता आहे़ अनेकांनी आपल्या पाल्याच्या भविष्यासाठी, मुलीच्या लग्नासाठी, पैसे मिळतील या हेतूने गुंतवणूक केली़ मात्र त्यांच्या हाती भोपळा पडला़ भोकर पोलिसात अंजनाबाई सूर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विशाल कुंडगुलवार व श्रुतिका कुंडगुलवार यांच्याविरूद्ध गुरुवारी दुपारी गुन्हा नोंदविण्यात आला़ पो.नि. संदिपान शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक सुशील चव्हाण तपास करीत आहेत.