लोकमत न्यूज नेटवर्कशहागड : शेतक-यांना परवडणाºया २६५ ऊसाच्या वाणाच्या लागवडीस कारखानदारांनी कमी रिकव्हरीच्या नावाखाली लागवडीला बंदी घातली आहे. बंदीच्या घाटामुळे नवीन जातीच्या लागवडीसाठी शेतक-यांना भुर्दंड बसत आहे.महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीच्या सातारा जिल्ह्यातील पडेगाव ऊस ऊस संशोधन केंद्रात सन. २००७ साली ऊस संशोधन अधिकारी डॉ. सुरेश पवार यांनी विकसित केलेल्या को. २६५ ऊसाला कारखानदार विरोध करत आहेत. या जातीची उत्पादन क्षमता, रिकव्हरी, साखर उतारा उत्तम असताना साखर कारखानदार चुकीचे धोरण अवलंबताना दिसत आहे. चुकीच्या धोरणामुळे ऊसतोडीतही काळाबाजार होत असल्याचे दिसते आहे.ऊसाची २६५ जात संशोधनासाठी पडेगाव संशोधन केंद्राचे संशोधक डॉ. सुरेश पवार, डॉ. राजाराम पाटील, रामदास गायकवाड, डॉ. जितेंद्र खटोड या कृषी शास्त्रज्ञांनी अवघ्या पाच वर्षांत २६५ प्रगत जातीचा शोध लावला. खोडव्याची सहा पिके घेता येऊन पाण्याचा तान सहन करणारी जात आहे. आडसाली हेक्टरी उत्पन्न दोनशे टन पूर्व हंगामी १६५ टन, सुरु १५०, तर खोडवा १३० टनाचे उत्पादन निघते. तर इतर जाती पेक्षा २५ टन उत्पन्न अधिकच निघते.राज्यात १९६५ ते १९९६ पर्यंत को. ७४० ही एकमेव जात होती. त्यानंतर ७२१९ व ८६०३२ या दोन जाती ऊस उत्पादकांमध्ये लोकप्रिय होत्या. मध्यंतरीच्या काळात ऊसाच्या अनेक जाती आल्या व गेल्या परंतु को.एम. २६५ जात २००७ मध्ये प्रसारित झाली. २६५ या ऊसाच्या जातीने दोन वर्षांतच लोकप्रियतेचा कळस गाठल्यामुळे तामिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेशात या जातीने इतर जातीला मागे टाकल्याचे अनेक उदाहरणे आहेत. ही जात शेतकºयांना उपयुक्त असून, केवळ रिकव्हरी व साखर उतारा ही जात परिपक्व होण्याच्या आत गाळप केली तर कशी साखर उतारा देईल, असा प्रश्न निर्माण होत आहे. मराठवाड्यातील शेतकºयांची २६५ या ऊसाची तोड ही ४२० दिवसानंतर केली तर, कारखानदारांना साडेदहा ते अकरापर्यंत रिकव्हरी मिळेल. कमी पाण्यात किंवा महिना दोन महिने पाण्याचे प्रमाण कमी असले तरी २६५ तग धरून राहतो. कमी खर्चातही एकरी पन्नास टन उत्पन्न निघते. याला फक्त साखर कारखानदारांकडून विरोध होत असल्याचा आरोप बळीराजा जायकवाडी प्रकल्प ऊस- कापूस उत्पादक शेतकरी मंच चे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र हातोटे यांनी केला आहे.समर्थ कारखान्यात इतर ऊसाचे बेणेही उपलब्ध आहेत. जात १००१ - बेण प्रतिटन ३००० रुपये., जात ८००५ - बेण रोप साडेतीन रुपये प्रमाणे., जात ८६०३२ - बेण २५०० रुपये प्रमाणे. , जात २६५ - बेण २५०० रुपये उपलब्ध असल्याचे समर्थ सहकारी साखर कारखान्याचे कृषी मदतनीस ए. एस. पठाण यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले.
रिकव्हरीच्या नावाखाली २६५ ऊस लागवडीवर बंदीचा घाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 12:13 AM