औरंगाबाद : रोनित फुलारी याची भेदक गोलंदाजी आणि त्यानंतर रोहित पाईकराव व गुरुप्रसाद आलमखाने यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर नांदेडने एडीसीए स्टेडिमवर महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे १४ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत वर्चस्व राखले.रोनित फुलारीच्या सुरेख गोलंदाजीच्या बळावर नांदेडने रायगड संघाला अवघ्या १३४ धावांत गुंडाळले. रायगडकडून मित ओसवालने २२ व चैतन्य पाटीलने १९ आणि ओम कुलकर्णीने १२ धावा केल्या. ओम जाधव १७ धावांवर बाद झाला. नांदेडकडून रोनित फुलारी याने १६ धावांत ५ गडी बाद केले. मिर्झा अली बेग याने ४३ धावांत ३, तर गुरुप्रसाद व हर्षमितसिंग यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात नांदेडने दिवसअखेर १ बाद १६३ अशी धावसंख्या रचताना आपली स्थिती भक्कम केली. नांदेडकडून रोहित पाईकराव ५० आणि गुरुप्रसाद आलमखाने ६९ धावांवर खेळत आहेत. रोनित फुलारी ३२ धावा काढून बाद झाला. रायगडकडूनदर्शन महाडिक याने ३५ धावांत १ गडी बाद केला.संक्षिप्त धावफलकरायगड : पहिला डाव ४७.१ षटकांत सर्वबाद १३४. मित ओस्वाल २२. रोनित फुलारी ५/१६, मिर्झा अली बेग ३/४३).नांदेड : पहिला डाव : ४२ षटकांत १ बाद १६३. (रोहित पाईकराव खेळत आहे ५०, गुरुप्रसाद आलमखाने खेळत आहे ६९, रोनित फुलारी ३२. दर्शन महाडिक १/३५).
रायगडविरुद्ध नांदेडचे वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 12:41 AM