लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : देश-विदेशातील पर्यटकांना नजरेसमोर ठेवून दक्षिण मध्य रेल्वेतील नांदेड आणि औरंगाबाद रेल्वेस्टेशनच्या विकासासाठी सुमारे १२ कोटींचा निधी मिळणार आहे; परंतु या निधीमध्ये नांदेडला आधी प्राधान्य दिले जात आहे. औरंगाबाद रेल्वेस्टेशनला निधी मिळण्याची नुसती प्रतीक्षा करावी लागत आहे.देशातील २४ रेल्वेस्टेशनसाठी रेल्वे आणि पर्यटन मंत्रालयाने २४० कोटी रुपये मंजूर केले आहेत. या २४ मध्ये नांदेड आणि औरंगाबाद रेल्वेस्टेशनचा समावेश आहे. या निधीतून प्रवाशांना सोयी-सुविधा देण्यासह जागतिक दर्जाचे रेल्वेस्टेशन बनविण्यावर भर देण्यात येत आहे. जवळपास १२ कोटींचा निधी दोन्ही रेल्वेस्टेशनला देण्यात येणार आहे. यामध्ये आतापर्यंत नांदेड रेल्वेस्टेशनला १ कोटीचा निधी मिळाला आहे; परंतु औरंगाबाद रेल्वेस्टेशनला निधी मिळण्यासाठी नुसतीच वाट बघावी लागत आहे. परिणामी, पर्यटनदृष्ट्या रेल्वेस्टेशनचा विकास करण्यास अडचणी येत आहेत. आगामी आर्थिक वर्षांत औरंगाबाद रेल्वेस्टेशनसाठी पैसे मिळण्यासाठी प्रयत्न केला जात आहेत, अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या अधिकाºयांनी दिली.
१२ कोटींच्या निधीमध्ये नांदेडला आधी प्राधान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 12:12 AM