शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

शिवस्वरूप नारायणदेवबाबा यांचे देहावसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 12:53 AM

कन्नड तालुक्यातील श्रीक्षेत्र वाकी येथील शिवेश्वर देवस्थानचे तपोवृद्ध शिवस्वरूप प.पू. नारायणदेवबाबा (९३) यांचे वृद्धापकाळाने देहावसान झाले

लोकमत न्यूज नेटवर्कचिंचोली लिंबाजी : कन्नड तालुक्यातील श्रीक्षेत्र वाकी येथील शिवेश्वर देवस्थानचे तपोवृद्ध शिवस्वरूप प.पू. नारायणदेवबाबा (९३) यांचे वृद्धापकाळाने देहावसान झाले. गेल्या पंधरा दिवसांपासून त्यांच्यावर औरंगाबादेत खाजगी रुग्णालयात उपचार सुरूहोते. सोमवारी पहाटे ४.१५ वाजता वाकी येथील शिवेश्वर मंदिरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सोमवारी दुपारी वाकी येथे हजारो भाविकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपस्थितांना अश्रू आवरणे कठीण झाले होते. वाकीसह पंचक्रोशीतील सर्व व्यवहार बंद ठेवून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.शिवस्वरूप नारायणदेवबाबा यांचे पूर्ण नाव नारायण अश्रुबा पल्हाळ होते. बाबांच्या पश्चात पत्नी जनाबाई, मुले ह.भ.प. नामदेव महाराज पल्हाळ, सदाशिवभाऊ, भगवानराव, मुली प्रयागबाई, अलकाबाई, काशीबाई, जावई ,सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.नारायणदेवबाबा कैलासवासी झाल्याचे कळताच राज्यातील व राज्याबाहेरील लाखो चाहते व शिष्य वर्गावर दु:खाचा डोंगर कोसळला. बाबांचे पार्थिव भक्तांच्या अंतिम दर्शनासाठी शिवेश्वर मंदिरात ठेवण्यात आले होते. सजवलेल्या रथातून टाळ-मृदंगाच्या गजरात गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्यसंस्कारसमयी आ. सुभाष झांबड, माजी आमदार नितीन पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष नामदेव पवार, किशोर पाटील, संतोषराव दसपुते, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष मानसिंग पवार, माजी शिक्षणाधिकारी डॉ. टी. पी. पाटील, जि. प. सदस्य संदीप पाटील, शिवाजी ठाकरे, संतोष कोल्हे, अशोक मगर, भाऊ पाटील (त्र्यंबकेश्वर संस्थान), माजी महापौर डॉ.भागवत कराड, संजय खंबायते, डॉ. संजय गव्हाणे, तहसीलदार महेश सुधळकर, संजना जाधव, वैजयंती खैरे, अनिल पाटील सोनवणे, शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, कृष्णा पाटील डोणगावकर, जितेंद्र जैस्वाल, भाजप जिल्हा उपाध्यक्ष कल्याण जंजाळ, अवचित वळवळे, डॉ. अण्णा शिंदे, शिवनेरी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष आबासाहेब पवार, उदयसिंग राजपूत, यादवराव गुरुजी, सरपंच श्रीराम जंजाळ, काकासाहेब जंजाळ, संजयआबा देशमुख, लक्ष्मणराव देशमुख, उपसरपंच पंडित गव्हांडे, पोलीस पाटील शिवाजी तरळ, भगवान जंजाळ, तंटामुक्ती अध्यक्ष विठ्ठल जंजाळ, राजू पवार, प्रेमराज जंजाळ, पुंडलिक जंजाळ आदींसह राजकीय, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील मान्यवर, भाविक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे यांनीही फोन करून बाबांना श्रद्धांजली वाहिली.विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, महामंडलेश्वर शिवगिरीजी महाराज (निफाड), महामंडलेश्वर शांतीगिरी महाराज (वेरूळ), महामंडलेश्वर परमानंदगिरीजी महाराज (भांगसीमाता गड), महामंडलेश्वर धर्माचार्य योगीराज दयानंद महाराज (शेलगाव), शनिभक्त सुखदेव महाराज (शनैश्वर देवस्थान वाकी-नेवपूर), महामंडलेश्वर मुक्तानंदजी महाराज, भीमराव दळवी महाराज, रमेशगिरी महाराज (कोपरगाव), विष्णूगिरी महाराज (सुरमाळ गड), किसन महाराज (वाकी), ज्ञानेश्वर माऊली महाराज (शेलूदकर), सोमेश्वर महाराज (वडोदवाडी), भोलेगिरी महाराज (निमगाव), अशोकगिरी महाराज, कृष्णगिरी महाराज (जामडी), पल्लोड महाराज (औरंगाबाद), बाळू महाराज (डोंगरगाव), प्रेमगिरीजी महाराज (लोहगाव), केवलानंद महाराज गौताळा आश्रम आदींनी नारायणदेवबाबा यांचे उत्तराधिकारी ह.भ. प. नामदेव महाराज यांचे सांत्वन करून बाबांना श्रद्धांजली अर्पण केली.