पैठण : नाथषष्ठी सोहळ्यासाठी येणा-या वारकरी, भाविकांना आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, हा भक्तीमय सोहळा आनंददायी होण्यासाठी सर्व यंत्रणांनी निश्चित केलेली जबाबदारी पार पाडावी, अशा सूचना अप्पर जिल्हाधिकारी पी.एल.सोरमारे यांनी पैठण येथे मंगळवारी अधिका-यांना दिल्या.स्वयंसेवकांनी हा उत्सव व्यवस्थित पार पाडण्यासाठी पैठण नगर परिषदेत नाव नोंदणी करुन पुढाकार घ्यावा,असे आवाहनही सोरमारे यांनी केले.पैठण येथील कीर्तन सभागृहात नाथषष्ठी पूर्वतयारी आढावा बैठक पार पडली. बैठकीस नगराध्यक्ष सूरज लोळगे,जि.प. सभापती विलास भुमरे, उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव, न.प. मुख्याधिकारी सोमनाथ जाधव, तहसीलदार महेश सावंत, पोलीस निरीक्षक चंदन ईमले, पं.स. गटविकास अधिकारी भास्कर कुलकर्णी, संत एकनाथ महाराज विश्वस्त मंडळाचे रावसाहेब महाराज गोसावी, रघुनाथ महाराज गोसावी आदींसह सर्व विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.सोरमारे यांनी विभागनिहाय नियोजनाचा आढावा घेतला व खातेनिहाय जबाबदारीचे वाटप करण्यात आले. ३ मार्च रोजी पुन्हा कार्यवाहीबाबत प्रत्यक्ष पाहणी करण्यात येऊन आढावा घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.यावेळी विश्वस्त मंडळाचे रावसाहेब महाराज गोसावी, रघुनाथ महाराज गोसावी, सूरज लोळगे, विलास भुमरे, पत्रकार, स्थानिकांनी सूचना केल्या. त्यांच्या सूचनांची दखल घेऊन संबंधितांना तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश सोरमारे यांनी दिले. प्रारंभी तहसीलदार महेश सावंत यांनी सोहळ्याच्या नियोजनाबाबत उपस्थित अधिका-यांना माहिती दिली.दांडीबहाद्दर अधिकाºयांवर कारवाई करातालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयाच्या प्रमुख अधिकाºयांनी या बैठकीला दांडी मारली. ही बाब सभापती विलास भुमरे यांनी लक्षात आणून दिली व प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी केली.
नाथषष्ठी सोहळा :पैठण येथे वारकरी, भाविकांना अधिकाधिक सुविधा द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 1:09 AM