शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
3
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
4
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
5
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
6
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
7
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
8
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
9
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
10
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
11
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
12
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
13
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
14
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
15
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
16
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
17
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
18
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
19
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

छत्रपती संभाजीनगरात नॅशनल करन्सी रॅकेट; शेकडो बँक खात्यातून कोट्यवधींचे बेनामी व्यवहार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2024 12:48 PM

गुप्तचर यंत्रणा, पोलिसांच्या कारवाईत करन्सी रॅकेट उघडकीस; देशविघातक कृत्यासाठी पैसे वापरले जात असल्याचा संशय

छत्रपती संभाजीनगर : महाविद्यालयीन विद्यार्थी, तरुणांच्या नावे बँक खाते उघडून विविध राज्यांमधून त्याद्वारे व्यवहार करायचा. भारतात बंदी असलेल्या आभासी चलनात (व्हर्च्युअल करन्सी गुंतवून पुन्हा विविध देशांच्या चलनात रूपांतर करून कोट्यवधींचा बेनामी व्यवहार करणारे करन्सी रॅकेट उघडकीस आले आहे. गुप्तचर यंत्रणेच्या माहितीनंतर शहर पोलिसांनी गुजरातच्या तरुणासह शहरातील दोन तरुणांना बुधवारी अटक केली.

उत्सवकुमार चंदुभाई भेसानिया (२३, रा. सूरज, गुजरात), ऋषिकेश शिवनाथ भागवत (२३, रा. सिंहगड कॉलनी, एन-६) व अनुराग भाऊसाहेब घोडके (२१, रा. म्हसोबानगर, जाधववाडी) अशी आरोपींची नावे आहेत. शहरात अनेक महिन्यांपासून हे रॅकेट सुरू होते. पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर बुधवारी कारवाईचे आदेश दिले. उत्सवकुमार निराला बाजार येथील हॉटेलात मुक्कामासाठी आल्याची माहिती मिळाली होती. निरीक्षक संभाजी पवार, गीता बागवडे, अशोक भंडारे, सहायक निरीक्षक राजेंद्र बनसोडे, मोसीन सय्यद, कदीर देशमुख यांनी छापा टाकला. तेव्हा तिघेही मोबाईलद्वारे बँकेचे व्यवहार करताना रंगेहाथ सापडले.

कसे चालते रॅकेट ?दिवसाला लाखांचे व्यवहार, नंतर खाते बंद- उत्सवकुमार, ऋषिकेश व अनुरागच्या सहा महिन्यांपासून संपर्कात आहे.- अनुराग, ऋषिकेश शहरातील मित्र परिवार, तरुण, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे कागदपत्रे घेऊन बँक खाते उघडतात. या बँक खात्यांना जोडण्यासाठी मोबाईल क्रमांक मात्र उत्सवकुमार देत होता.- खाते उघडल्यानंतर कार्ड, पासबुक, चेकबुकही उत्सवकुमार घेऊन जात होता. त्या खात्यांमध्ये कोट्यवधी रुपये जमा होतात.- त्यातून रोख काढून पुन्हा सीडीएम मशिनद्वारे अन्य खात्यांमध्ये टाकले जातात. मग ते क्रिप्टो, यूएसडीटीमध्ये गुंतवून पुन्हा भारतीय चलनात रुपांतरित करायचे.- विशेष म्हणजे, ठराविक व्यवहारानंतर खाते बंद केले जाते.

ब्लॅक मार्केट, डार्क नेटचा वापरआरोपी सर्व व्यवहार, घेवाण-देवाण, खाते उघडण्याची प्रक्रिया करण्यासाठी डार्क नेट म्हणजेच देशात बंदी असलेले डकडक गो सर्च इंजिन, ट्रस्ट वॉलेटचा वापर करत होते. त्यामुळे त्यांच्या हेतूवर देखील तपास यंत्रणांना मोठा संशय आहे.

७ ते १० हजार रुपयेउत्सवकुमार व त्याचे सूत्रधार देशभरात रॅकेटसाठी तरुणांना पैशांचे आमिष दाखवून हेरतात. ऋषिकेश, अनुरागने शहरातील अनेक तरुणांच्या नावे बँक खाते उघडून सूत्रधारांना चालवण्यासाठी देतात. यासाठी खातेधारकाला ७ ते १० हजार रुपये दिले जातात. शहरातील नामांकित महाविद्यालयांचे तरुण या रॅकेटमध्ये अडकले आहेत. ऋषिकेश कॉलेज ड्राॅप आऊट तर अनुराग विज्ञान शाखेचा विद्यार्थी आहे.

यापूर्वी देखील चौकशीया प्रकारच्या रॅकेटशी संबंधित शहरातील तरुणांची यापूर्वी केंद्रीय तपास यंत्रणांनी चौकशी केली होती. हा पैसा अवैध व्यवसायांसह देशविरोधी कृत्यांसाठी वापरला जात असल्याचा संशय गुप्तचर यंत्रणांना आहे. न्यायालयाने त्यांना १५ सप्टेंबरपर्यंत कोठडी सुनावली.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी