या मागणीसाठी ११ जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. १७ जानेवारीपर्यंत हे धरणे चालूच राहणार आहे. देशभरातील ५५० जिल्ह्यांमध्ये भारत मुक्ती मोर्चाचे वामन मेश्राम व राष्ट्रीय किसान मोर्चाचे रामसुरेश वर्मा यांच्या नेतृत्वाखाली सध्या असेच धरणे आंदोलन सुरू आहे.
गेल्या ५० दिवसांपासून शेतकऱ्यांचे दिल्ली परिसरात आंदोलन सुरू असूनही व त्यात ६० शेतकऱ्यांचा बळी जाऊनही मोदी सरकारला काही वाटत नाही,हे आश्चर्यकारक आहे, असे राष्ट्रीय किसान मोर्चाचे जिल्हा प्रभारी दिलीप तळेकर, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मौलाना नईम काश्मी,भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष डॉ राहुल सोनुले व भारत मुक्ती मोर्चाचे शहराध्यक्ष अलीयार खान यांनी पत्र परिषदेत मत नोंदविले.
या धरणे आंदोलनात मायाप्पा तुराई, भगवान खोतकर,काजी शकील अहमद, भाऊसाहेब शेळके, रवी भालेराव, संतोष साळवे, गयास अहमद शेख, धर्मेंद्र मेश्राम, अविनाश धायगुडे, विनोद बनसोडे, दौलत झरे, युसूफ खान आदी सहभागी झाले आहेत.