लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : पुरातन वेदशास्त्राविषयी माहिती जाणून घेण्यास इच्छुक असणाºया नागरिकांना सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे. कारण १९ ते २१ जानेवारीदरम्यान शहरात राष्ट्रीय वैदिक संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवसांच्या काळात विविध ज्ञानसत्रांत तज्ज्ञ वेदशास्त्राविषयी इत्थंभूत माहिती देणार आहेत.महर्षी सांदीपनी राष्ट्रीय वेदविद्या प्रतिष्ठान, उज्जैन आणि श्री संत ज्ञानेश्वर वेदविद्या प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय वैदिक संमेलन होत आहे. सिडकोतील कॅनॉट प्लेस येथील अग्रसेन भवन येथे १९ रोजी सकाळी ८ वाजता संमेलनाला सुरुवात होणार आहे. करवीरपीठाधीश जगद्गुरू शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांच्या प्रमुख उपस्थितीत, लोकप्रतिनिधींच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. त्यानंतर एन-९ येथील रेणुकामाता मंदिरापासून ते जगद्गुरू संत तुकाराम नाट्यगृहापर्यंत वाहन रॅली काढण्यात येणार आहे. सकाळी १० वाजता संमेलनाचे उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंह यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी शंकराचार्य विद्यानृसिंह भारती, पं. गणेश्वरशास्त्री द्रविड आणि पं. वसंतराव गाडगीळ यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. दुसरे सत्र अग्रसेन भवन येथे होणार आहे. यात ‘वेददर्शन’ या विषयावर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. सायं. ४ वाजता बजरंग चौक ते अग्रसेन भवन शोभायात्रा काढण्यात येणार आहे. रात्री ८.३० वाजता वेदरंग नाटिका व भक्तिगीतांचा कार्यक्रम लक्ष्मीकांत धोंड व विश्वनाथ दाशरथे हे सादर करणार आहेत. २० रोजी सकाळी चतुर्वेद विविध शाखामंत्र पाठाने सुरुवात आणि वेदमूर्र्तींच्या हस्ते वैदिकांचा सन्मान करण्यात येईल.१८ रोजी वेदोत्सव शोभायात्रेचे आयोजनराष्ट्रीय वैदिक संमेलनाच्या प्रचारासाठी १८ रोजी वेदोत्सव शोभायात्रा काढण्यात येणार आहे. सायंकाळी ४ वाजता संस्थान गणपती मंदिर परिसरातून शोभायात्रेला सुरुवात होईल व खडकेश्वर मंदिरासमोरील मैदानात समारोप होणार आहे.
औरंगाबाद येथे राष्ट्रीय वैदिक संमेलन १९ जानेवारीपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 12:15 AM
पुरातन वेदशास्त्राविषयी माहिती जाणून घेण्यास इच्छुक असणाºया नागरिकांना सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे. कारण १९ ते २१ जानेवारीदरम्यान शहरात राष्ट्रीय वैदिक संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवसांच्या काळात विविध ज्ञानसत्रांत तज्ज्ञ वेदशास्त्राविषयी इत्थंभूत माहिती देणार आहेत.
ठळक मुद्देउपक्रम : तीन दिवस वेदावरील विविध ज्ञानसत्रांचे नियोजन