शिऊर : एलपीजी गॅस, डिझेल, पेट्रोलची सातत्याने दरवाढ होत असून केंद्र सरकारच्या मनमानी कारभारामुळे सर्वसामान्य जनतेला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे, असा गंभीर आरोप करून वैजापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शिऊर बंगला येथे केंद्र सरकारचा आक्रमकपणे निषेध व्यक्त करण्यात आला. तर केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करीत आंदोलकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुखवटा घालून नागरिकांना चॉकलेट वाटून अनोखे आंदोलन केले.
भाजपशासित केंद्र सरकार हे हुकूमशाहीचे सरकार आहे. सर्वसामान्य जनतेला अडचणीत आणून त्याचे जगणे अवघड करीत आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रतापराव निंबाळकर यांनी केला. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भागीनाथ मगर, उपसभापती राजेंद्र मगर, पं.स.चे माजी सभापती सुभाषचंद्र जाधव, बाळासाहेब भोसले, उत्तम निकम, दत्तू पाटील, आनंद निकम, प्रेम राजपूत, अनिल भोसले, दिंगबर मोरे, बाळा जाधव, सुनील खांडगौरे, अकबर भाई, प्रशांत शिंदे, विजय झिंझुर्डे, मेहबूब शेठ, भीमसिंग चंदवडे, बाळू पवार, प्रकाश ठुबे, संकेत चुडीवाल यांची उपस्थिती होती. शासनाच्या वतीने स.पो.नि. गोरख शेळके, तलाठी शंकर जाधव यांनी निवेदन स्वीकारल्यानंतर आंदोलन थांबविण्यात आले.
090621\img_20210609_160814.jpg
इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक