शहरं
Join us  
Trending Stories
1
अबूझमाडच्या जंगलात ३० नक्षल्यांचा खात्मा; घातपाताचा डाव उधळून लावला
2
हरयाणात भाजपची हॅट् ट्रिक की, काँग्रेसचे होणार पुनरागमन? मतदानाला सुरुवात
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सार्वजनिक क्षेत्रातून प्रशंसा, कौटुंबिक व दांपत्य जीवनात सौख्य लाभेल
4
मंत्रालयात आमदारांच्या जाळीवर उड्या; विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळांसह आदिवासी आमदारांचा संताप
5
पुण्यात मित्राला झाडाला बांधून तरुणीवर सामूहिक बलात्कार; तीन नराधमांचा शाेध सुरू
6
राज्यातील अकृषक कर पूर्ण माफ; सरकारचा निर्णयांचा धडाका सुरूच, मंत्रिमंडळ बैठकीत ३३ निर्णय 
7
हावभाव बघूनच एकमेकींना समजून घेतो; शेफालीने सांगितले स्मृतीसोबतच्या ताळमेळीचे रहस्य
8
हार्दिकची १८ कोटींची  पात्रता आहे का? : मूडी
9
राज्यात आज धडाडणार राजकीय तोफा; मोदी वाशिम-ठाण्यात तर राहुल गांधी कोल्हापुरात
10
भारताचा दारुण पराभव, न्यूझीलंडची विजयी सलामी
11
धारावी प्रकल्पातील अनधिकृत बांधकामांसंदर्भात समिती; न्या. दिलीप भोसले अध्यक्ष, सहा सदस्यही नेमले
12
समाज घटकांसाठी महामंडळे; मंत्रिमंडळ बैठकीत जैन, बारी, तेली समाजासाठी महत्त्वाचे निर्णय 
13
पंतप्रधानांच्या डोळ्यात धूळफेक, अपूर्ण योजनेचे उद्घाटन
14
एकीकडे इराण म्हणतोय युद्ध नकोय, दुसरीकडे म्हणतोय इस्रायलवर हल्ले करणारच 
15
मोदींचे ठरले! ९ वर्षांनी पाकच्या दौऱ्यावर जाणार भारताचे परराष्ट्रमंत्री; ‘एससीओ’ परिषदेत हाेणार सहभागी
16
“राज्यातील राजकारणाला जनता कंटाळली, एक सुसंस्कृत पर्याय म्हणून तिसरी आघाडी”: संभाजीराजे
17
दहशतवाद्यांचा कर्दनकाळ माजी IPS अधिकारी आता BCCI मध्ये काम करणार; मोठी जबाबदारी मिळाली!
18
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
19
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
20
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   

नवरात्रोत्सवाचे वेध! छत्रपती संभाजीनगरातील १६८ देवींची मंदिरे रंगू लागली

By प्रशांत तेलवाडकर | Published: October 06, 2023 5:11 PM

आठ दिवसांनी होणार घरोघरी घटस्थापना

छत्रपती संभाजीनगर : सर्वांना आता नवरात्रोत्सवाचे वेध लागले आहेत. हा उत्सव म्हणजे देवीची आराधना करण्याचा काळ. अवघ्या ८ दिवसांवर येऊन ठेपला आहे. कर्णपुरा येथील देवीच्या मंदिराची रंगरंगोटी अंतिम टप्प्यात आली आहे तर शहरातील विविध भागांतील देवीच्या १६८ मंदिरात रंगरंगोटीला सुरुवात झाली आहे.

छावणी परिसरात कर्णपुरा यात्रा भरते. ही यात्रा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा असते. येथे राज्य परराज्यातील व्यापारी येऊन यात्रेची शान वाढवत असतात. येथील देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक दररोज येत असतात. यामुळे येथे गणेशोत्सवापासूनच देवीच्या मंदिराला रंग देणे सुरू झाले होते. आता रंगकाम अंतिम टप्यात येऊन पोहोचले आहे. गाभाऱ्यात सागवानी लाकडावरील कोरीव कामाला सध्या रंग देणे सुरू आहे. या मंदिराच्या पाठीमागील बाजूस असलेल्या बालाजी मंदिरातील रंगकाम उद्यापासून सुरू होत आहे. देवीचे या शिवाय शहरात १६८ मंदिरे आहेत. त्यांनाही रंगरंगोटी केली जात आहे. जळगाव रोडवरील रेणुकामाता मंदिरात फ्लोअरिंगचे पॉलिश करणे संपले आहे. तर बीड बायपासवरील रेणुका माता मंदिरात येत्या दोन दिवसांत देखावा उभारल्या जाणार आहे.

दुर्गादेवीची सर्वाधिक २९ मंदिरेशहरात मी १ हजार मंदिरांची माहिती संकलित केली. त्यात देवीचे १६८ मंदिर आहेत. त्यातही दुर्गादेवीची सर्वाधिक २९ मंदिरे, तुळजा भवानीची २३ मंदिरे, लक्ष्मी मातेची १८ मंदिरे, कालिकामातेची १२, रेणुकामातेची ११ मंदिरे तर सप्तश्रृंगी देवीच्या ११ मंदिरांचा समावेश आहे. यात काही मंदिरे ३५० वर्षे जुनी तर काही १०० वर्षे जुनी आहेत. तर काही मागील २० वर्षात बांधण्यात आली आहेत.- प्रो. डॉ. अनिल मुंगीकर, मंदिरांचे अभ्यासक

नावीन्यपूर्ण नावाचे मंदिरशहरात देवीची मंदिरे आहेत. प्रत्येक मंदिराला नाव देण्यात आले आहे. त्यात सिद्धाबिका माता मंदिर, दधीमाता मंदिर, सुसवाणी माता मंदिर, मुत्यालम्मा माता मंदिर, लाखाबाई देवी मंदिर, पाणाजी माता मंदिर, मम्मा देवी मंदिर, सत्तीमाता मंदिर, येडेश्वरी देवी मंदिर, अलक्षित देवतेचे मंदिर अशी नावे वैशिष्ट्यपूर्ण आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादNavratriनवरात्री